शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार कामे कागदावर

By admin | Updated: December 26, 2014 23:46 IST

मग्रारोहयो : अत्यल्प मजुरीमुळे खेड्यापाड्यातील मजुरांची पाठ

रहिम दलाल -रत्नागिरी  -महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी अत्यल्प मजुरी देण्यात येत असल्याने मजूर पुढे येत नाहीत. त्यामुळे जिल्हाभरात ४३१० कामे प्रशासकीय मंजुरी मिळूनही ती मागणी न आल्याने सुरु झालेली नाहीत. त्यामुळे या योजनेचा आकडा कितीही फुगवला तरी कामे न झाल्याने तो कागदावरच राहिला आहे. मग्रारोहयोमुळे ग्रामीण भागात रोजगार मिळणार आहे़ त्यासाठी अंगमेहनतीची कामे करणे आवश्यक आहे़ या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला वर्षातून १०० दिवस काम मिळणार असल्याने हजारो कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे़ मग्रारोहयोच्या कामांसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून ६८१८ प्रस्ताव रत्नागिरी जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. यामध्ये मंडणगड ५१६, दापोली ९२६, खेड ३२५, चिपळूण ७६८, गुहागर ७९५, संगमेश्वर ५९४, रत्नागिरी १२८२, लांजा ५८५ आणि राजापुरातून १०२१ प्रस्ताव आले होते. त्यापैकी ५४७० प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. मंजूर कामांपैकी ११६० कामे सुरु करण्यात आली आहेत. त्यांची कामनिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. त्यामध्ये विहिरी २०, कुक्कुटपालन गोठे २६, शौचालय ९१८, शोषखड्डे ८०, फळबाग लागवड ४१, गाळ काढणे २, रस्ते ६, नेडेप खत गांडूळ खत ५६, खड्डे व वृक्षलागवड १, वृक्षसंगोपन ११ व संरक्षक भिंत ५ या कामांचा समावेश आहे़ जिल्ह्यात ११६० कामे सुरु असली तरी अजून ४३१० कामे मजूर पुढे येत नसल्याने ती सुरु करण्यात आलेली नाहीत़ सर्वाधिक ९३१ कामे रत्नागिरी तालुक्यातील तर सर्वात कमी २0९ कामे मंडणगड तालुक्यातील आहेत.जिल्ह्यात मग्रारोहयोमुळे लाखो स्थानिक मजुरांना काम मिळणार आहे़ मात्र, मजुरांची नांवे नोंदविली जात असून, कामे करण्यासाठी स्थानिक मजूर पुढे येत नसल्याने ४३१० कामे अजूनही सुरु झालेली नाहीत़ ही कामे सुरु न झाल्याने दरवर्षीप्रमाणे चालू आर्थिक वर्षाचा मग्रारोहयोचा आराखडाही केवळ कागदावरच राहणार आहे़ मग्रारोहयोला लोकप्रतिनिधीही आवश्यक तेवढे प्राधान्य देत नाहीत़ या योजनेचे महत्व जनतेला पटवून देऊन ती तळागाळापर्यंत नेणे आवश्यक आहे़ त्याचप्रमाणे मजुरीच्या दरात वाढ होणे आवश्यक आहे. त्यामुळे मजुरांना गावातच काम मिळेल़ तसेच शहराकडे जाणाराही लोंढा थांबेल़ त्यासाठी ग्रामीण पातळीवर प्रामाणिक प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.अनेक कामे रखडली...तालुकासुरु न झालेली कामेमंडणगड२०९दापोली६२०खेड५४३चिपळूण५७२गुहागर४२५संगमेश्वर२६१रत्नागिरी९३१लांजा३०१राजापूर३९६मंजुरी मिळाली...मग्रारोहयोच्या माध्यमातून स्थानिक मजुरांना गावातच काम मिळणार आहे. या मजुरांना शासनाकडून प्रत्येक दिवसाला १६८ रुपये एवढी अत्यल्प मजूरी देण्यात येते. मात्र, आंबा बागायतदार व अन्य खासगी काम करताना २५० रुपयांपेक्षा जास्त मजूरी मिळत असल्याने स्थानिक मजूर कामासाठी पुढे येत नाही. त्यामुळे कामांना मंजूरी मिळूनही ती कामे सुरु झालेली नाहीत. चालू आर्थिके वर्षामध्ये मग्रारोहयोतून सुरु असलेल्या कामांवर सुमारे २ कोटी रुपये निधी खर्च झाला आहे. यामध्ये मागेल त्या मजुराला काम मिळेल, ही संकल्पना असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगाराला संधी उपलब्ध आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील ५७ जिल्हा परिषद गटामध्ये ५९ ग्रामपंचायती मग्रारोहयोमध्ये मॉडेल गावे म्हणून घेण्यात आली होती. मॉडेल गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतींकडून १०४५ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी ८४१ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली, तर मॉडेल गावांमध्ये २८६ कामे पूर्ण झाली असून ३९३ कामे सुरु आहेत. ग्रामीण भागातील मजुरीचे दर हे या कामातील मजुरीपेक्षा कितीतरी अधिक आहेत. त्यामुळे या कामांकडे स्थानिक मजुरांनी पाठ फिरवल्याचे दिसून येते.