शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

भूमी अभिलेख खात्यात चार पदे अद्याप रिक्तच

By admin | Updated: July 18, 2016 00:02 IST

संगमेश्वर तालुका : उपअधीक्षकांचा कार्यभारही प्रभारींवर

देवरूख : संगमेश्वर तालुका भूमी अभिलेख कार्यालयात विविध ४ पदे रिक्त असल्याने ग्रामस्थांची ससेहोलपट होत आहे. उपअधीक्षक पदाचा कार्यभारही प्रभाऱ्यांकडे सोपवण्यात आल्याने कामे रेंगाळली आहेत. ही पदे लवकरात लवकर भरावतीत, अशी मागणी होत आहे. कार्यालयातील उपअधीक्षकांची बदली झाल्याने हे पद रिक्त आहे. या पदाचा पदभार रत्नागिरी येथील भूमापन अधिकारी एस. एस. खांडेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आठवड्यातील एक दिवस मंगळवारी खांडेकर देवरूख कार्यालयात हजर असतात. नियोजित दिवशी एखादी बैठक लागल्यास त्याही दिवशी अनुपस्थित राहतात. यामुळे कामे जैसे थे स्थितीत राहात आहेत. याचा त्रास तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ग्रामस्थांना सहन करावा लागतो. एखाद्या कामाचा निपटारा करण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लोटत असल्याने ग्रामस्थांची ससेहोलपट सुरू आहे. नकला काढण्यासाठी प्रतिलिपी लिपीक पद आहे. मात्र, देवरूख कार्यालयातील हे महत्त्वाचे पद गेली अनेक वर्षे रिक्त आहे. याचप्रमाणे आवक - जावक लिपीक १ पद, शिपाई १ पद, शिरस्तेदार १ पद रिक्त आहे. या रिक्तपदांमुळे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. काही कर्मचारी प्रशिक्षणासाठी काढण्यात आले आहेत, तर काही कर्मचारी आजारी असल्याने रजेवर असल्याने हे कार्यालय कधीकधी सुनेसुने दिसून येते. सध्या जमीन खरेदी करणे, विक्री करण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. दलालांना यामुळे खुराक मिळतो. पदे रिक्त असल्याने कामे पूर्णत्त्वास जाण्यास कालावधी लोटत असल्याने तेही हिरमुसले आहेत. (प्रतिनिधी)