शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

माजी सरपंच, ग्रामविकास अधिकारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 01:14 IST

माखजन ग्रामपंचायतीमधील वित्त आयोगात ३६ लाखांचा अपहार केल्याची तक्रार

 आरवली : संगमेश्वर तालुक्यातील माखजन ग्रामपंचायती मधील बाराव्या आणि तेराव्या वित्त आयोगातील अपहारप्रकरणी तत्कालिन सरपंच सतीश कुंभार व ग्रामविकास अधिकारी जितेंद्र मांगले यांना संगमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरूवारी मध्यरात्री २.१६ वाजता करण्यात आली. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलानाला या कारवाईमुळे यश आले आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनीच हा अपहार झाल्याचे उघड केले होते. मात्र, त्यानंतर कारवाईबाबत विलंब होत होता. यासाठी स्वाभिमान प्रतिष्ठानचे महेश बाष्टे व स्थानिक ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला होता. याची दखल घेत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नरेंद्र पराते यांनी संगमेश्वर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना २९ पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. माखजन ग्रामपंचायतीमध्ये बारावे व तेराव्या वित्त आयोगातील रकमेचा अपहार करण्यात आला होता. ग्रामनिधीतून सन २०११-१२ साली झालेल्या ३६ लाख ९६ हजार ४२१ या अंदाजित कामांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद नसून, त्यांचे मूल्यांकन केले नाही. तत्कालिन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने रस्ते, पायवाट, स्मशानशेड, विहीर व गटारे या विविध कामांसाठी निधी खर्च दाखवला होता. प्रत्यक्षात कामेच झाली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता. ३६ लाखांचा अपहार ग्रामस्थांनी उघडकीस आणल्यानंतर ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत २८ जुलै २०१५ रोजी तत्कालिन सरपंच सतीश कुंभार आणि ग्रामविकास अधिकारी जितेंद्र मांगले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरीही आरोपींना अटक झाली नव्हती. १७ जानेवारी २०१५ रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश असतानासुद्धा पंचायत समितीकडून फिर्याद दाखल करण्यास तक्रार दाखल करण्यास ७ महिन्याचा कालावधी लागला. कारवाई होत नाही, हे लक्षात येताच ग्रामस्थांनी पुन्हा २७ जुलै २०१५ रोजी पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण केले होते. त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, अटक होत नव्हती म्हणून स्वाभिमान प्रतिष्ठानचे महेश बाष्टे यांनी १९ फेब्रुवारी २०१६ रोजी ग्रामस्थांसह पोलीस स्थानकासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (वार्ताहर)