शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

परदेशातील नागरिकांना भारतीय फराळाची चव!

By admin | Updated: October 27, 2016 23:20 IST

कुरिअरकडे गर्दी : नोकरी, शिक्षणासाठी गेलेल्यांना फराळाबरोबरच अभ्यंगस्नानाचे उटणे रवाना

रत्नागिरी : दीपावलीचा सण अवघ्या चार दिवसांवर आला आहे. अनेक भारतीय मंडळी परदेशात नोकरीसाठी कार्यरत आहेत, तर शिक्षणासाठी गेलेल्या युवा मंडळींची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. परदेशातील मंडळींना दीपावलीचा आनंद घेता यावा, यासाठी फराळ, कपडे तसेच अभ्यंगस्नानासाठी उटणे पाठवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या कुरियर व्यावसायिकांकडे ग्राहकांची प्रचंड गर्दी आहे. सौदी अरबमध्ये १९ लाख, तर संयुक्त अरब अमिरातमध्ये ३५ लाख भारतीय विविध ठिकाणी सेवेत आहेत. अमेरिका, इग्लंड व अन्य विविध देशात नोकरी तसेच शिक्षणासाठी अनेक भारतीय आहेत. मर्चंट नेव्हीतही लाखो मंडळी कार्यरत आहेत. परदेशात विविध ठिकाणी मर्चंट नेव्हीतील मंडळींचा समुद्रमार्गे जहाजाव्दारे प्रवास होतो. जहाजावर काम करणाऱ्यांना परदेशातील एखाद्या किनाऱ्यावर जहाज थांबले तरी कॅप्टनच्या परवानगीशिवाय कोठेही खरेदीसाठी जाता येत नाही. त्यामुळे मर्चंट नेव्हीतील मंडळींनाही सणाचा आनंद सहकारी मित्रांसोबत घेता यावा, यासाठी भारतातील कुटुंबाकडून फराळ व अन्य साहित्य पाठवले जाते. ५९५ रूपये किलो व अन्य कर मिळून किलोला हजार ते पंधराशे रूपये खर्च येतो. कुरिअर पाच ते सहा दिवसात परदेशातील पत्त्यावर पोहोचते. त्यामुळे १५ तारखेपासूनच कुरिअरसाठी गर्दी सुरू झाली आहे. अनेक भारतीय बांधव, कुटुंबीय आपापल्या नातेवाईकांसाठी कुरिअरद्वारे फराळ व अन्य वस्तू पाठवत आहेत. त्यामुळे कुरिअर व्यवसायाला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. भाऊबीजेपर्यंत कुरिअरसाठी गर्दी राहणार असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. परदेशातूनही भारतातील कुटुंबीयांसाठी भेटवस्तू कुरिअरव्दारे पाठवण्यात येत आहेत. सणापूर्वी वस्तू पोहोचाव्यात, यासाठी कुरिअर व्यावसायिक सध्या प्रचंड व्यस्त आहेत. तसेच दीपावलीच्या सुटीतही सुटी घेणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. दिवाळीच्या कालावधीत ही गर्दी आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी) ठराविक वस्तूंनाच परवानगी परदेशात काही ठिकाणी केवळ नामवंत कंपन्यांच्या वस्तू पाठवल्या जाऊ शकतात. काही ठिकाणी लिक्विडसारख्या वस्तूंना मज्जाव आहे. घरगुती पदार्थही काही ठराविक देशात पाठविणे शक्य नाही. काही मोजक्या देशात घरगुती पदार्थ पाठवण्यास मुभा असल्याने फराळाच्या जिन्नसपैकी काही जिन्नस पाठवण्यात येत आहेत.