शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांना मोताद, कमावत्या लोकांना अन्नसुरक्षा...

By admin | Updated: July 16, 2014 23:04 IST

शासनाने योजना आणली. मात्र

पांडुरंग माने-पाचलउपाशीपोटी जगणाऱ्या लोकांना भूकेमुळे झोप लागत नाही. अशा परिस्थितीशी झगडणाऱ्या लोकांसाठी शासनाने अन्नसुरक्षा योजना आणली. मात्र, शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनीच या योजनेचे बारा वाजवले आहेत. स्वच्छ आणि पुरेसे धान्य हे उद्दिष्ट घेऊन सुरु झालेल्या या योजनेत पाचल परिसरातील मिष्ठान्न जेवणारी जनताच सामील करुन घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे परिस्थितीशी दोन हात करुन जगणाऱ्या व्यक्तींचा यादीत समावेश नसल्याने गरिबीचे चित्र ‘मागील पानावरुन पुढे चालू’ असेच आहे.अन्नसुरक्षा योजनेचे पंख गावागावात वेगाने पसरले आहेत. मात्र, पाचल (ता. राजापूर) परिसरात लाभार्थींची यादी तयार करताना अधिकाऱ्यांनी सावळा गोंधळ घातला आहे. पुरेसे धान्य येऊनही केंद्र शासनाच्या या योजनेचा पुरता फज्जा उडाला आहे. योजनेच्या नियमाला बगल देत पुरवठा अधिकाऱ्यांनी रेशन दुकानदारांच्या मर्जीतील लोक यादीत कसे बसतील, याकडेच जास्त लक्ष पुरवल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे तालुका प्रशासनातील अधिकारीही यामध्ये सहभागी असल्याचे दिसून येत आहे. ज्यांना या योजनेचा खरोखर लाभ मिळणे गरजेचे आहे, अशी अनेक कुटुंब यादीतून बाहेर फेकली गेली आहेत. दुसरीकडे ज्यांच्या घरी मिष्टान्न मिळते, अशा लोकांची नावे या अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे श्रीमतांना तीन रुपये किलो दराने धान्य व गरिबांना मात्र बाजारभावांशी संलग्न मिळणारे धान्य घ्यावे लागते. असा उलटा न्याय बघायला मिळत आहे.गरीब कुटुंबाची कहाणीपाचल येथील गंगाधर रावजी जाधव हे हलाखीचे जीवन जगत आहेत. मागासवर्गीय कुटुंबातील कमावती व्यक्ती आजारी आहे. दोन मुले पदरी असल्याने करिष्मा जाधव या मोलमजुरी करुन कुटुंबाचा गाडा ओढताना दिसतात. मुलांचा शैक्षणिक खर्च, पतीचे आजारपण आणि संसारासाठी सुरु असलेली ओढाताण असे व्यस्त गणित सोडवत करिश्मा आता दिवस ढकलत आहेत. मात्र, अन्नसुरक्षा योजनेंतर्गत धान्याचा एक दाणाही त्यांच्यापर्यंत पोचलेला नाही. कारण हे कुटुंब ना तहसीलदारांच्या मर्जीतले, ना रेशन दुकानदाराच्या. त्यामुळे मिळेल त्या भावात धान्य खरेदी करणे त्यांच्या नशिबी आले आहे. अन्नसुरक्षेच्या लाभासाठी या महिलेने तहसील कार्यालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र, २७ मार्च २०१४ रोजी दाखल झालेला अर्ज तहसील कार्यालयातील फाईलमध्ये अडगळीत पडून आहे. या अर्जावर सुनावणी सोडाच पण त्याचे पुढे काय झाले, याबाबत कोणीच काही सांगायला तयार नाही. आजही करिश्मा या मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत आहेत. कारण त्यांच्यासाठी शासनाने असलेला घास अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने अन्य कुणी पळवला आहे.