शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणमध्ये पूरसदृश स्थिती; मध्यरात्री शहरात पाणी घुसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचिपळूण : गेले चार दिवस पडणाºया मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यात नदीनाल्यांना पूर आला आहे. वाशिष्ठी व शीव नदीने धोक्याची पातळी ओलांडली नसली तरीही शहराच्या काही भागात मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पाणी घुसले होते. धामणदेवी रस्त्यावर पेढे हायस्कूलजवळ झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. बहादूरशेख येथील पूल धोकादायक झाल्याने या पुलावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिपळूण : गेले चार दिवस पडणाºया मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यात नदीनाल्यांना पूर आला आहे. वाशिष्ठी व शीव नदीने धोक्याची पातळी ओलांडली नसली तरीही शहराच्या काही भागात मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पाणी घुसले होते. धामणदेवी रस्त्यावर पेढे हायस्कूलजवळ झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. बहादूरशेख येथील पूल धोकादायक झाल्याने या पुलावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गुहागरकडील भागात जाणारी एस. टी. वाहतूक बायपासमार्गे वळविण्यात आली होती.गेले चार दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात मंगळवारी सकाळपर्यंत २४ तासांत १६०.३३ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. चालू मोसमात १ जूनपासून आजअखेर ३७९२.६५ मि.मी. पाऊस पडला आहे. रात्रभर पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे मध्यरात्रीनंतर शहरातील वाशिष्ठी व शीव नदीला पूर आला. वाशिष्ठी नदीने ४.८० मीटरपर्यंत पाण्याची पातळी गाठली होती. पाच मीटरपर्यंत पाणी वाढल्यास धोक्याचा इशारा देण्यात येतो; परंतु इथपर्यंत पाणी पोहोचले नव्हते. जुन्या बाजार पुलाला पाणी लागले होते.