शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणमध्ये पूरसदृश स्थिती

By admin | Updated: July 16, 2014 23:04 IST

वाशिष्ठी व शीव नदीच्या पाण्याची पातळी वाढ

चिपळूण : तालुक्यात दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्या, नाले ओसंडून वाहात आहेत. वाशिष्ठी व शीव नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने शहराच्या काही भागात पाणी घुसले. त्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. कामथे - टेरव रस्त्यावर झाड पडल्याने एस. टी.ची वाहतूक विस्कळीत झाली होती, तर पेठमाप येथे विजेच्या तारा तुटल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.गेले दोन दिवस समाधानकारक पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्रभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. आज (बुधवार) सकाळी ८ वाजेपर्यंत १२१.७७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या हंगामात एकूण ९९९.१० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. वाशिष्ठी व शीव नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सकाळी ७ च्या सुमारास चिपळूण बाजारपुलावरुन पाणी गेले. बाजारपुलाच्या दोन्ही बाजूला गुडघाभर पाणी साचले होते. नाईक कंपनी ते मच्छी मार्केट दरम्यानचा रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. शहरातील गटारांमधून निचरा न झाल्याने गटारे तुंबली होती. गटारातील पाणी रस्त्यावरुन वाहात होते. परकार कॉम्प्लेक्स परिसरात रस्त्यावरुन पाणी जात होते. अनेक भागात रस्त्यावर पाणी आल्याने दुचाकी व छोट्या वाहनांना त्रास होत होता. बाजारपूल ते पेठमाप परिसरात गटाराचे काम अपूर्ण असल्याने या रस्त्यावर गुडघाभर पाणी होते. त्यामुळे नागरिकांचा खोळंबा झाला होता. आज दिवसभर सरीवर पाऊस कोसळत होता. अधूनमधून पाऊस विश्रांती घेत होता. उक्ताड येथील प्राथमिक शाळेच्या परिसरात पाणी साचल्याने येथील विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. पहिल्या पावसात अशी स्थिती झाली होती. दरवर्षी नाल्याची सफाई करुन पाण्याचा निचरा होत होता. परंतु, आज खूपच पाऊस पडल्याने शाळेच्या परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस लागल्याने नद्यांना पूर आला आहे. धरपाण्याच्या लावणीला आज वेग आला होता. त्यामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे. या हंगामात प्रथमच पाणी भरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आणखी काही काळ सतत पाऊस पडला तर शहरात पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसामुळे काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला दरडी घसरल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. परंतु, जनजीवनावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. (प्रतिनिधी)