शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तिघांना पाच वर्षाची सक्तमजुरी

By admin | Updated: January 3, 2017 23:40 IST

न्यायालयाचा निकाल : पंचायत समिती सदस्यावरील गोळीबार प्रकरण

रत्नागिरी : रत्नागिरी पंचायत समिती सदस्य विवेक विलास सुर्वे (सदखोल जयगड) यांच्यावर गोळीबार करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांना अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे़ पी. झपाटे यांनी दोषी ठरवले़ मंगेश कमलाकर साळवी, सचिन विनायक मोरे व अनिरुद्ध कमलाकर साळवी अशी या तिघांची नावे असून, या तिघांना ५ वर्षे सक्तमजुरी व १ लाख ५ हजार दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली़तीन वर्षांपूर्वी ८ सप्टेंबर २०१३ रोजी गणेशोत्सव काळात जयगड जेटी येथे जयगडचा राजाच्या मंडपाचे काम चालू होते़ सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती सदस्य विवेक सुर्वे व त्याचा मित्र राजेश आरेकर हे तेथे गप्पा मारत होते़ त्यावेळी मंगेश साळवी, सचिन मोरे व अनिरुद्ध साळवी यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून तसेच हत्याराने वार करून विवेक सुर्वे यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता़ यात विवेक सुर्वे गंभीर जखमी झाले होते़ त्यांनी जयगड पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती़ त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला होता़ तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवाजी मुळीक या गुन्ह्याचा तपास करत होते़ या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले होते़ सरकारी पक्षाचे पुरावे ग्राह्य मान्य मानून अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे़ पी. झपाटे यांनी मंगेश साळवी व सचिन मोरे याला भा. दं. वि. कलम ३०७ सह ३४ अन्वये ५ वर्ष सक्तमजुरी, १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा, भा. दं. वि. कलम ३२६ सह ३४ तिघांना ४ वर्ष सक्तमजुरी व प्रत्येक १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने कैद, कलम ३२४ नुसार २ वर्ष सक्तमजुरी व ५ हजार दंड, कलम ३२३ सह ३४ नुसार सहा महिने सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना कैद, हत्यार कायदा कलम ३/२५ (१)(ब) अन्वये मंगेश साळवी याला १ वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना कैद, तर हत्यार कायदा कलम ५/२७ (१) नुसार ३ वर्ष सक्तमजुरी प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले़ (वार्ताहर)