शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही दिनात पाच तक्रारी निवारण

By admin | Updated: December 16, 2014 00:11 IST

वैयक्तिक व सामाजिक प्रश्नांसंदर्भात तक्रार अर्ज आले.

कुडाळ : कुडाळ तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात आलेल्या पाच तक्रार अर्जांचे योग्यप्रकारे निवारण केले जाईल, असे आश्वासन तहसीलदार जयराज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिले. परंतु शहरातील वाहतूक समस्या, स्वच्छतागृहे, अतिक्रमणे याबाबत अजूनही कोणत्याच ठोस कारवाईकरिता प्रशासन कोणतीच पावले उचलत नसल्याचे दिसून आले. कुडाळ तहसीलदार कार्यालयात आयोजित केलेल्या या लोकशाही दिनाला तहसीलदार देशमुख यांच्यासह गटविकास अधिकारी वासुदेव नाईक व सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या लोकशाही दिनात एकूण पाच वैयक्तिक व सामाजिक प्रश्नांसंदर्भात तक्रार अर्ज आले. यामध्ये वालावल येथील इंदिरा वालावलकर यांनी न्यायालयाचे आदेश असतानाही ग्रामपंचायत आपल्या नावावर घर करीत नाही, असा तक्रार अर्ज दिला. तर लवू मयेकर यांनी इंदिरा आवास योजनेसाठी संमतीपत्र खोटे दिल्याबाबत, कसाल येथील रवींद्र कसालकर यांनी कसाल मागासवर्गीय वस्तीमध्ये वाटेवर कुंपण घालून येथील नळपाणी योजना मोडून टाकलेल्या तेथीलच १३ जणांवर कारवाई करण्याबाबत तक्रार अर्ज दिले. तर बांबर्डे येथील तुकाराम धुरी यांनी सातबारात दुरुस्ती करण्याबाबत अर्ज दिला होता. यावेळी शहरातील वाहतूक कोंडी समस्या, स्वच्छतागृहे आणि अतिक्रमणांबाबत काय उपाययोजना सुरू आहे, असे विचारले असता, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ योग्य ती कारवाई सुरू आहे, अशी माहिती दिली. तसेच कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीचे काम शासनाच्या निकषात न राहता निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून या नव्याने बांधलेल्या संरक्षक भिंतींच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कुडाळ सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांनी तक्रार अर्जातून दिली. (प्रतिनिधी)जात प्रमाणपत्रात खोटी माहिती : कदमहिर्लोक ग्रामपंचायत सदस्या अश्विनी चव्हाण यांनी निवडणूक कमिशनकडे सादर केलेल्या जात प्रमाणपत्रात खोटी माहिती दिली असून त्यासंदर्भात चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असा तक्रार अर्ज मोहन कदम यांनी दिला.