शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘सेतू’मधील पाच कर्मचाऱ्यांचे राजीनामे

By admin | Updated: July 8, 2017 17:57 IST

देवरूखमधील प्रकार : तहसीलदारांकडे मागणी

आॅनलाईन लोकमत देवरूख (जि. रत्नागिरी), दि. ८ : अपुरे कर्मचारी व संगणकांची संख्यादेखील मर्यादित असल्याने कामात आधीच अडचणी, त्यातच राजकीय पदाधिकारी व लोक्रप्रतिनिधींचा देवरूखमधील ‘सेतू’ कार्यालयात वाढलेला हस्तक्षेप याला कंटाळून या कार्यालयातील ४ कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. या कर्मचाऱ्यांनी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावाला व मानहानीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे निवेदन तहसीलदारांकडे सादर केले आहे. यामुळे ‘सेतू’चा कारभार गेले दोन दिवस तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीच चालवत आहेत.

शैक्षणिक कामासाठी उत्पन्न, नॉनक्रिमीलेअर, अधिवास, राष्ट्रीयत्व व जातीचा दाखल्यांची आवश्यकता असते. पालक विहीत नमुन्यामध्ये आपला प्रस्ताव सेतू कार्यालयात दाखल करतात. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर नागरिकांना संबंधित दाखला दिला जातो. दाखल्याविना नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी काही वर्षापूर्वी सेतू कार्यालयाची उभारणी करण्यात आली होती. मात्र, कार्यालयातील रिक्त पदे तसेच संगणकांचा अभाव यामुळे वाढलेले कामकाज करताना संबंधित कर्मचाऱ्यांना दमछाक होत होती.

कार्यालयात प्रामाणिक काम करत असतानाही राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दबावाला व अपमानास्पद वागणुकीला कंटाळून राजीनामे देण्याची वेळ आमच्यावर आल्याची कैफियत या निवेदनात येथील कर्मचारी निधी चव्हाण, प्राची भुवड, स्वप्नील मोरे, सोनाली करंडे यांनी मांडली आहे. या कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढाच या निवेदनाच्या माध्यमातून देवरुख तहसीलदारांकडे सादर केला आहे.

मे महिन्यापासून सेतू कार्यालयातून विविध प्रकारचे दाखले देण्याचे प्रमाण वाढले आहे. या कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मात्र, तैनात कर्मचारी सुटीच्या दिवशीही कार्यालयात हजर राहून कामाचा निपटारा करतात. या कार्यालयाचे काम सुरळीत व्हावे यासाठी हे कर्मचारी सदैव प्रयत्नशील असतात. सध्या कार्यालयात दाखल्यांची संख्या जास्त व काम करण्यासाठी केवळ दोनच संगणक संच उपलब्ध आहेत. त्यातच इंटरनेट सुविधाही बंद असल्याने कामामध्ये अडचणी येतात.प्रशासन राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या बाजूने राहणार असेल तर यापुढे ‘सेतू’ कार्यालयात काम करणे शक्य नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा कार्यालयातील हस्तक्षेप प्रचंड प्रमाणात वाढला असून, त्यांच्याकडून दबावतंत्राचाही वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या परिस्थितीत कार्यालयात काम करणे शक्य नसल्याचे या चार कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

यावर आता तहसीलदार कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. ‘सेतू’तील कर्मचाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने मंगळवारी व बुधवारी सेतू कार्यालयाचा कारभार तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चालवला. त्यामुळे सेतूचा प्रश्न आता देवरूखात चिघळणार आहे.