शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये पाच लहान मुले कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST

खेड : तालुक्यातील सुसेरी गावात २ ते १४ वयोगटातील ५ लहान मुले कोरोनाबाधित झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीला आला. ...

खेड : तालुक्यातील सुसेरी गावात २ ते १४ वयोगटातील ५ लहान मुले कोरोनाबाधित झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीला आला. तालुक्यातील कोरेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सुसेरी क्रमांक १ या गावातील एकाच वाडीतील ५ लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर तालुका आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. ग्रामीण भागात लहान मुले कोरोनाबाधित झाल्याने प्रशासनासमाेर चिंता वाढली आहे़

सुसेरी क्रमांक १ येथील एका कुटुंबातील पती -पत्नी हे कोरोनाबाधित सापडल्याने त्यांच्या कुटुंबातील उर्वरित सदस्यांची अँटिजन तपासणी करण्यात आली हाेती. त्यामध्ये पाच लहान मुले बाधित सापडली आहेत. यामध्ये एक मुलगी तर ५, ७, ९ व १४ वयाची मुले आहेत. या पाचही मुलांना प्रशासनाने खेड शहरातील शिवतेज कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना कोरेगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. नितीन मोरे यांनी सांगितले की, या पाचही लहान मुलांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. डेल्टा प्लसच्या अनुषंगाने या पाच मुलांची पुढील तपासणी आरोग्य विभाग करणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमध्ये सध्या ६६ रूग्ण कोरोनाबाधित असून, त्यातील २५ रूग्ण गृह अलगीकरणात असून, उर्वरित ३५ रूग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. गेल्या मार्च महिन्यापासून या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर आरोग्य केंद्रांतर्गत ३,५०६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

-------------------------

ही मुले बाधित झाली, याचा अर्थ लगेच जिल्ह्यात तिसरी लाट आली, असे म्हणता येणार नाही. घरातील आई, वडील बाधित झाल्यामुळे ही मुले बाधित झाली आहेत. त्यांना कोरोनाची खूपच सौम्य लक्षणे होती. आता ही मुले उपचारानंतर चांगली आहेत. नागरिकांनी घाबरुन न जाता शासकीय निर्देशांचे पालन करावे़

- डॉ. किरण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी

--------------------------

कुटुंबातील कर्त्या पुरुषाला कोरोनासदृश्य लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याने शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू केले होते. हा रुग्ण घरातच उर्वरित कुटुंबातील सदस्यांबरोबर घरात राहत होता. त्यामुळे या कुटुंबातील या लहान मुलांना संसर्ग झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.