शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
4
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
5
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
6
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
7
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
8
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
9
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
10
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
11
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
12
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
13
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
14
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
15
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?
16
एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट
17
कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!
18
IND vs WI: दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला!
19
स्वप्न शास्त्र: स्वप्नात सुंदर महिला दिसणे हे कसले संकेत? नशीब फळफळणार की गोत्यात येणार?
20
"आम्हालाही अशा तंत्रज्ञानाची गरज," 'या' भारतीय अ‍ॅपचे फॅन झाले ब्रिटनचे पंतप्रधान

फिटनेस फंडा : खेळाडूंचा फिटनेस त्याचे मनाेविज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

मला आठवते, प्रादेशिक मनोरुग्णालयात मी कार्यरत असताना आठवड्यातून दोनदा सकाळी ९.००च्या दरम्यान कम सप्टेंबर (त्या वेळेचं गाजत असलेलं संगीत)चं ...

मला आठवते, प्रादेशिक मनोरुग्णालयात मी कार्यरत असताना आठवड्यातून दोनदा सकाळी ९.००च्या दरम्यान कम सप्टेंबर (त्या वेळेचं गाजत असलेलं संगीत)चं संगीत तबकडीवर लावायचो. संपूर्ण आमराईत आणि आम्ही नंतर त्याचं नामकरण केलंलं प्रियदर्शनी रंगमंच आणि समोरचं मैदान यावर गोलाकार करुन उपचार घेत असलेले रुग्ण यांना उभे करायचो. मग बॉल एकमेकांकडे फेकण्याचा खेळ (डॉज बॉल) सुरु व्हायचा. हळुहळू सर्व मैदान या रुग्णांनी भरुन जायचं. त्यावेळचे डॉ. य. वा. केळकर, वैद्यकीय अधीक्षक आणि माझे ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ मित्र डॉ. गोविंद गोलम माझ्या या ‘संगीत खेळ उपचारावर’ जाम खुश असायचे. कारण रुग्णांचे हे खेळ, त्याचं नैराश्य पळवायचे, सक्रियता वाढवायचे. तो माणसाळायचा. आमचे ज्येष्ठ मित्र डॉ. शाश्वत शेरे, वैद्यकीय अधीक्षक असेपर्यंतचा हा मोठा काळ मी आणि तिथल्या कर्मचारी, अधिकारी यांनी अनुभवला. कारण यातून आम्ही सायको अ‍ॅनॅलिसीस (मनोविश्लेषणात्मक) उपचारांचा तो एक भाग बनला.

ही कथा सांगण्याचा हेतू एवढाच की, खेळ असे सकारात्मक, क्रियात्मक, मनोरंजनात्मक, समूहात्मक, संवादात्मक, अस्तित्वात्मक आणि निर्मितीक्षम आत्मविश्वासात्मक बदल घडवतात. आरोग्यदृष्ट्या सांगायलाच नको, फायदेच फायदे आहेत.

आदिमानव ते प्रगत मानव, कुटुंब ते टोळी आणि अन्नाची धडपड, जंगलातलं जीवन, शिकार आलीच, मग स्वसंरक्षणही आलेच. कालांतराने मानव आणि संस्कृती जोपासणं सुरु झालं. अशाच एके क्षणी समाज विकासकांच्या ध्यानात आलं. युवकांना शरीर आणि मनाने धडधाकट आणि कणखर बनवायचे आणि ऑलिम्पिक स्पर्धांचा उगम झाला. पुढे दीड हजार वर्षे स्पर्धा कालांतराने बंद पडली. कारणे अनेक असावीत. मात्र, त्याची पुन:श्च रुजवात फ्रेंच उमराव क्युबर्तीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केली. युवा पिढी, विविध देश, त्यांची अस्मिता आणि अस्तित्व फुलले. ते सामूहिक एकजुटता याचं आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि एकोप्याचे प्रतीक ठरले.

आपण मैदानी खेळांचा विचार केला पण बैठे खेळही तीच एकाग्रता आणि सकारात्मकता देतात. कॅरम, बुद्धीबळ, प्ले ब्रीज हे अतिशय आनंददायी खेळ आहेत. थोडक्यात ज्या वयात जे खेळ खेळता येतील ते खेळ खेळा. एफ. जे. सायमन या ब्रिजपटूने ब्रिज खेळावर एक सुंदर पुस्तक लिहिले आहे, त्यात ते म्हणतात, ‘स्वत: चुका करणं आणि टाळणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकेच समोरच्या स्पर्धकांच्या आणि जोडीदाराच्या चुकांवर टीका करायचं टाळणं हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या चुका टळतात. सुसंवाद घडतो.’ खेळाच्या मनोविज्ञानात हा ही एक घटक महत्त्वाचा आहे. म्हणूनच खेळ संपल्यावर स्पर्धक किंवा प्रतिस्पर्धी यांनी एकमेकांशी हस्तांदोलन करायचे असते. खेळातील चुरस किंवा लढत संपल्याबरोबर सहअस्तित्वाच्या ह्या समाजाच्या खुणा असतात. त्या जपायला हव्यात. एक सामना जिंकण्यामुळे कुणी थोर होत नाही किंवा हरल्यामुळे लहानही होत नाही. एक भान सतत हवे की, आपल्याला आपली कामगिरी उत्तम करायची आहे, त्यामुळे ही स्पर्धा स्वत:च्या उत्कर्षाचीही असते.

१९२० साली डॉ. स्कुल्स ह्या न्युरॉलॉजिस्टने (मज्जाविकार तज्ज्ञ) यांनी ऑटोजेनिक तंत्र विकसित केले. यात स्वत:च स्वत:ला स्वयं सूचना देऊन खेळात किंवा कुठल्याही स्पर्धेत भाग घेताना स्वत:ला नियंत्रित करणे आवश्यक असते, हे सिद्ध केले. ह्यानुसार या तंत्रात पायापासून डोक्यापर्यंतच्या सर्व स्नायूंत रिलॅक्सेशन, शिथिलीकरण किंवा ताणरहीत अवस्थज्ञ किंवा शांतपणा अनुभवायचा असतो. सोबत जिंकण्यासाठी स्वत:च स्वत:ला सूचना द्यायच्या असतात. याचा निव्वळ खेळातच नाही, स्पर्धेतच नाही तर अटीतटीच्या क्षणी निर्णय क्षमता आणि धडाडीसाठी नक्कीच उपयोग होतो. म्हणून प्रत्येकाने ही सवय लावून घ्यावी, अर्थात मर्यादा ओळखून नाही तर कॉमेंट यायची, ‘हा सर्व फोलपणा आहे.’ लक्षात घ्या, एक ताणरहीत क्षण शरिरातल्या बुद्धी, क्रिया याचे रसायन आणि न्युरोट्रांसमीटर्सला सकारात्मकतेने चॅनेलाईज करतात. आत्मविश्वास, स्वत:वरील नियंत्रण आणि तातडीच्या क्षणार्धातील प्रतिक्षिप्त क्रिया ही खेळातील जिंकण्याची त्रिसुत्री आहे. मला जिंकायचं आहे, याऐवजी हीच संधी मला योग्य आहे, असे म्हणत खेळाडूंचे फिटनेस पुराण इथे थांबवतो.

(पुढील फिटनेस फंडे फ्रॅक्चर्स आणि फिजिओथेरपीबाबत, क्रमश:)