रत्नागिरी : जिल्ह्याच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहू लागल्याने, त्याचा परिणाम खाेल समुद्रातील मासेमारीवर झाला आहे. वादळी वाऱ्यांमुळे समुद्रात उंच लाटा उसळू लागल्याने, अनेक नौका समुद्रातून अनेक नौका माघारी परतल्या आहेत, तर अनेक नौकांनी समुद्रात जाणे टाळले. त्यामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प झाली आहे.
चाैपदरीकरणाचे काम जोरात
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम जोरदारपणे सुरू आहे. गेली अनेक वर्षे हे चौपदरीकरणाचे काम होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू हाेती. मात्र, आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. हातखंबा ते निवळी दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.
रस्त्याची कामे मार्गी लावण्याची मागणी
चिपळूण : शहरातील अनेक रस्त्यांची कामे रखडली असून, त्यासाठी किती पाठपुरावा करावा, रामतीर्थ तलाव ते महाराष्ट्र हायस्कूलचा रस्ता गेली दोन वर्षे अर्धवट स्थितीत आहे. पाग भागातील रस्त्यांची तीच अवस्था आहे. आता नागरिकांना खरे काय ते समजू लागले आहे. त्यासाठी रस्त्याची कामे मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाई लांबणीवर
रत्नागिरी : या वर्षीही जिल्हा परिषद कृषी विभागाकडून गावोगावी लोकसहभागातून बंधारे उभारण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. लांबलेल्या पावसामुळे डिसेंबर महिन्यात या कामाला सुरुवात झाली. या बंधाऱ्यांमुळे आजूबाजूच्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली असल्याने, पाणीटंचाई दूर जाण्यास या बंधाऱ्यांची मदत मिळाली आहे.
प्रवास करणे धोकादायक
रत्नागिरी : शहरातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीला लागून असलेल्या चर्मालय ते धनजीनाकापर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक व त्रासदायक ठरत आहे. केवळ खोदाई केलेल्या रस्त्याच्या कडेचे डांबरीकरण करण्यात आले आहे.
चायनीजबद्दल नागरिकांमध्ये नाराजी
चिपळूण : चाशहर परिसरात ठिकठिकाणी चायनीज पदार्थ विक्रीचे व्यवसाय सुरू आहेत. या पदार्थांची बेकायदेशीरपणे विक्री सुरू असून, आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होत असतानाही अन्न व औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शासन अटी, नियमांकडे दुर्लक्ष
रत्नागिरी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने विशेष लक्ष घालून काही नियम व अटींचे पालन करण्याचे आदेश जनतेला दिले आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अनेेक जण सॅनिटायझरचा वापर करीत नसल्याचे समोर आले आहे.