शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

खलाशी न परतल्याने मासेमारी अद्याप ठप्पच

By admin | Updated: August 24, 2016 23:44 IST

नौका बंदरातच उभ्या: नौकामालकांसमोर भवितव्याचा मोठा प्रश्न--मच्छिमारांचे भवितव्य अंधारमय भाग-१

रहिम दलाल-- रत्नागिरी =--खलाशी नसल्याने अनेक मासेमारी नौका बंदरामध्ये नांगरावर उभ्या आहेत. लाखो रुपयांची रक्कम आगाऊ घेऊनही खलाशी न परतल्याने नौकामालकांसमोर भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.पर्ससीन नेट मासेमारीवर बंदी घालून शासनाने मच्छिमारांच्या तोंडचा घास पळवला होता. त्यामुळे आज मच्छिमारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये सर्वांत मोठी अडचण होती आर्थिक पाठबळाची! बँकेकडे हात पसरून ही समस्या दूर केल्यानंतर आता खलाशांची समस्या निर्माण झाली आहे. जानेवारीनंतर पर्ससीन नेटने मासेमारी करणे बंदी घालण्यात आल्याने किनारपट्टीवरील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. त्याचा परिणाम इतरही संबंधित व्यवसायांवर झाला होता. लाखो रुपयांची कर्ज घेतलेल्या नौका मालकांसह टेम्पो मालक, पानपट्टीवाले, मच्छी विक्रेते, मासे कापणाऱ्या महिला तसेच बाजारपेठेतील इतर व्यावसायिकांवर याचा परिणाम झाला असून, सुमारे ७५०० कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. बंदीमुळे गेले सहा महिने खोल समुद्रातील मासेमारी ठप्प झाली होती. त्यावेळी नौकामालकांनी खलाशांना सुमारे तीन महिने तरी मासेमारीविना पगार दिला, शिवाय त्यांच्या खाण्या-पिण्याचाही खर्च उचलला होता. त्यावेळी अनेक खलाशांनी पलायनही केले होते. त्यांना दिलेली अ‍ॅडव्हान्स रक्कमही नौका मालकांना त्यांच्याकडून वसूल करता आली नसल्याने ते आर्थिक अडचणी आले होते. काही खलाशांनी मासेमारी सुरु झाल्यानंतर येणार असल्याचा शब्द मालकांना दिला होता. मात्र, मासेमारी १ आॅगस्टपासून सुरु झाली असली तरी अनेक खलाशी अद्याप परतलेले नाहीत. त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त नौका आज नांगरावर आहेत. लाखो रुपये आगाऊ देऊनही खलाशी न आल्याने नौकामालक अडचणीत सापडले आहेत. सहा महिने मासेमारी बंद असल्याने त्यांच्याकडे नवीन खलाशांना देण्यासाठीही पैसे नाहीत, अशी परिस्थिती आहे.पर्ससीन नेटने मासेमारी करण्यावर बंदी आदेश दिल्याने मच्छीमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने ते आर्थिक अडचणी सापडले आहेत. तीन महिने पर्ससीन नेट मासेमारी बंद राहिल्याने मच्छीमार संकटात सापडले असून, त्याचे परिणाम खोलवर झाले आहेत. आज त्यांच्याकडे अन्य खलाशांना देण्यासाठी पैसे नाहीत.