शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यामुळे मासेमारी संकटात

By admin | Updated: July 20, 2014 22:45 IST

ग्रामस्थ आक्रमक : तीव्र आंदोलनाचा इशारा

चिपळूण : वाशिष्ठी नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्याबाबत अखिल दाभोळखाडी भोई समाज कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा झाली. वाशिष्ठी नदीत केमिकल सोडल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत संबंधितांनी योग्य दखल न घेतल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अध्यक्ष आर. आर. जाधव यांनी दिला.अखिल दाभोळखाडी भोई समाज, मुंबई शहर व ग्रामीण कार्यकारिणीची सभा गोवळकोट येथील भोईराज सभागृहात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. लोटे एमआयडीसीतील केमिकल कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे वाशिष्ठी नदीपात्रातील मासे संपुष्टात आले आहेत. त्यामुळे पारंपरिक मासेमारी बंद झाली आहे. भोई समाजाचा मुख्य व्यवसाय अडचणीत आला आहे. होड्या, जाळ्यांसाठी घेतलेली कर्ज थकीत झाली आहेत. खाडीतील मासे बाजारात येत नसल्याने समुद्रातील मासळीचे दर वाढले आहेत. लोटे एमआयडीसीच्या सीईटीपीतून दूषित पाणी सोडणे बंद न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पारधी ,उदय जुवळे यांनी केले. यावेळी गोवळकोट सातगावचे अध्यक्ष मधुकर कासेकर, बबन कासेकर, मारुती मिंडे, चंद्रकांत कासेकर, राजेश सैतवडेकर, सचिन जुवळे, संतोष मिंडे, प्रमोद कासेकर, दीपक कासेकर आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत अखिल दाभोळखाडी मंडळाचे कायकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.(वार्ताहर)-गोवळकोट येथे अखिल दाभोळ खाडी भोई समाज कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय.- खाडी प्रदूषणमुक्त करण्याबाबत संबंधितांना निवेदन देण्याबाबत चर्चा. -नदीपात्रातील मासे मतुकीचे प्रमाण वाढतेय. या प्रकारामुळे परिसरातील कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. - प्रदूषणामुळे दाभोळ खाडी परिसरात मासेमारी पूर्णपणे ठप्प झाल्याचा आरोप करीत प्रदूषणकारी कंपन्यांनी योग्य मार्ग न स्वीकारल्यास अखिल दाभोळखाडी भोई समाज, मुंबई शहर व ग्रामीण कार्यकारिणीने संताप व्यक्त केला आहे.-गोवळकोट येथील बैठक प्रदूषणाच्या मुद्द्यावर गाजली. अशा सभांमध्ये नेहमी कंपन्यांना इशारा देण्यात यावा. ही संतापजनक गोष्ट असल्याचे व यापुढे प्रदूषणकारी कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी संतप्त मच्छिमारांनी केली आहे. निदान आता तरी काय करणार, याचे उत्तर हे बांधव संबंधितांकडे मागत आहेत.