शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील पहिले गायक, वादक संमेलन रत्नागिरीत

By admin | Updated: May 12, 2016 23:31 IST

वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम : गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या सभागृहात रंगणार जुगलबंदी

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये रविवार, दि. १५ मे रोजी गायक, वादक संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, कोकणात यावर्षी प्रथमच असा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम होत असल्याची माहिती रत्नागिरीतील प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर यांनी आज (गुरुवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.हार्मोनियमवादक चैतन्य पटवर्धन यांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे या संमेलनाची संकल्पना मांडली. त्यानंतर ग्रुप बैठक घेऊन १५ मे रोजी हे ‘गायक, वादक संमेलन’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात गायक व वादकांचा प्रामुख्याने सहभाग असणार आहे. यामध्ये शास्त्रीय गायन, सुगम गायन, वदन, नवीन रचना, फ्युजन, आदींचा समावेश आहे. शास्त्रीय गायनाने प्रारंभ तर फ्युजनने या संमेलनाची सांगता होणार आहे. या संमेलनामध्ये युवा कलाकारांपासून ज्येष्ठ कलाकारांचा सहभाग असणार आहे. यावेळी गायनासह विविध वाद्यांची रंगत रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या सभागृहात १५ रोजी हे संमेलन होणार असून, सायंकाळी ५.३० ते ९ या कालावधीत होणाऱ्या अभंग, भक्तीगीत, भावनाट्य, गझल फ्युजन, आदी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा आनंद रसिकांना विनामूल्य घेता येणार आहे. याचबरोबर संगीत क्षेत्रातील नव्या-जुन्या कलाकारांच्या परिचयाबरोबरच या क्षेत्रातील घडामोडींबाबतही यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील सांगितिक क्षेत्रात ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले, अशा जुन्याजाणत्या तसेच दिवंगत व्यक्तींवर तयार करण्यात आलेला खास लघुपट यावेळी दाखविण्यात येणार आहे. यात विनायकबुवा रानडे, भालचंद्रबुवा रानडे, चिंतामणी भागवत, विनायक जोशी, ‘अक्षत’चे सुहास पेंडसे, यशवंतराव पटवर्धन, राम गोवेकर, भगवान किलेकर, आदींचा समावेश आहे. तसेच या कार्यक्रमात ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. यात प्रसिद्ध संगीततज्ज्ञ, नृत्यगुरू बाळासाहेब हिरेमठ, हार्मोनियमवादक श्रीकृष्ण मुळ्ये, प्रसिद्ध शास्त्रीय गायक नाट्य कलावंत आनंद प्रभुदेसाई तसेच रत्नागिरीत पहिल्यांदा वाद्यवृंद मैफल संकल्पना सुरू करणारे विजय डाफळे यांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली. रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच असे आगळेवेगळे संमेलन भरत असून, रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)डिरेक्टरीचा मानसरत्नागिरी जिल्ह्यातील कलाकार मंडळी आता एकत्र येऊ लागली आहेत. त्यामुळे आता प्रत्येक तालुक्यातील कलाकारांची डिरेक्टरी काढण्याचा मानस असल्याचे जोगळेकर यांनी सांगितले.