शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक गटात ‘शांतीनगरचा राजा’ प्रथम

By admin | Updated: September 2, 2014 00:02 IST

गणेश सजावट स्पर्धा : घरगुती गटात संजय वर्तक विजेते

रत्नागिरी : के टी. व्ही. न्यूज चॅनेल, आर. के. डिजीटल आणि रत्नागिरी खबरदार ग्रुपतर्फे आयोजित श्री गणेश सजावट स्पर्धा २०१४ चा निकाल आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेत नाचणे येथील बाबा बार्इंग यांच्या ‘शांतीनगरचा राजा’ला प्रथम क्रमांक मिळाला आहे. टिळक आळी गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरी व कोकण रेल्वे गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरी यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. घरगुती गणेश सजावट स्पर्धेत कुवारबावचे संजय वर्तक, खानू येथील रविकांत राजाराम चव्हाण, बसणीतील सुनील गोपीनाथ शिवलकर यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. येत्या १० सप्टेंबरला स्वयंवर मंगल कार्यालयात दुपारी ३ वाजता पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.आयोजकांतर्फे घेतलेल्या पत्रकार परिषदेला संयोजन समितीचे अध्यक्ष उमेश शेट्ये, सचिव अलिमिया काझी, खजिनदार हेमंत वणजु, सल्लागार रज्जाक काझी, ओंकार फडके, अल्पना संसारे, कोमल तावडे, दादा वणजु आदी पदाधिकारी उपस्थित होते. घरगुती गणेशोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सजावट केली जाते. यामागे जे कलावंत दडलेले असतात, त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली. या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला असून, घरगुती सजावट स्पर्धेसाठी ३७, तर सार्वजनिक गणेश सजावट स्पर्धेसाठी १८ स्पर्धकांचे अर्ज प्राप्त झाले होते. दोन्ही गटांतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार, ५ हजार अशी रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. अन्य विजेते याप्रमाणे : सार्वजनिक सजावट स्पर्धा : उत्तेजनार्थ श्री रत्नागिरीचा राजा, मारुती मंदिर, रत्नागिरी. घरगुती सजावट स्पर्धेत उत्तेजनार्थ १) प्रशांत पाडावे, मिरजोळे, २) रमेश सावंत (जाकीमिऱ्या), ३) जीवन कोळवणकर (कुवारबाव). या स्पर्धेत विशेष उल्लेखनीय पारितोषिक चंद्रकांत सुपल, टीआरपी, रत्नागिरी, शशिकांत भिसे, खालची आळी, रत्नागिरी, शिरीष शिवगण, वळके पाली यांना जाहीर झाले आहे. बक्षीस वितरणाला पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे उपस्थित राहणार आहेत.(प्रतिनिधी)