शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोटेच्या ‘श्रेयस’ कंपनीत आगीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:51 IST

आवाशी : लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीतील जुनी श्रेयस व आता केसर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रासायनिक कंपनीत रविवारी ...

आवाशी : लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीतील जुनी श्रेयस व आता केसर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रासायनिक कंपनीत रविवारी दुपारी २ वाजता लागलेल्या आगीत कंपनीतील कच्च्या मालासह तयार माल, पत्राशेड व अन्य सामुग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली.दुपारी एक ते दोन या जेवणाच्या वेळेत अनेक कामगार जेवणासाठी प्लँटच्या बाहेर होते. मात्र, याचवेळी सीपीसी या प्लँटमध्ये वेल्डिंगचे काम सुरु असताना पडलेल्या ठिणगीमुळे शेजारील रिअ‍ॅक्टरने पेट घेतला व आग आजूबाजूच्या परिसरात पसरु लागली. तत्काळ शेजारील एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले. मात्र, त्यांनाही यायला उशीर झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. याचवेळी जेथे आग लागली तेथे दहा ते बारा कामगार काम करत होते, तर एकूण पहिली पाळी व साधारण शिफ्टमध्ये दोनशेहून अधिक कामगार काम करत होते. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.लोटे एमआयडीसी अग्निशमन दलाची दोन वाहने, एक खासगी टँकर, चिपळूण - खेड नगरपालिकांचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. यात सर्वात स्थानिक तरुणांची मदतकार्यात महत्त्वाची भूमिका होती. यामध्ये लोटे शाखाप्रमुख सचिन काते, चेतन वारणकर, संतोष कदम, गुणदेचे उपसरपंच तुकाराम बावदाणे, रुपेश काते, अनिल साळवी, प्रल्हाद सावंत, नंदू काते, प्रमोद आंब्रे, संतोष खरात, महेश देवरुखकर, सुरेश आखाडे, राजेंद्र बावदाणे, गोविंद खरात, विजय कदम, प्रशांत खानापुरे, ज्ञानेश्वर गोटल, समीर कालेकर, मनोज कालेकर, प्रथमेश जाधव यांनी जीवाची बाजी लावून आग विझविण्यात येणाºया ड्रमचा अडथळा, स्क्रॅप मटेरियल व अन्य सामान बाजूला करुन अग्निशमन दलाला मदत केली. घटनास्थळी घरडा कंपनीचे प्रकल्प प्रमुख आर. सी. कुलकर्णी, कृष्णा कंपनीचे व्यवस्थापक एस. एम. पाटील, नागानंदा, आवाशीचे सतीश आंब्रे यांनी मदत कार्यात पुढाकार घेतला. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.एमआयडीसीचे अग्निशमन दल कुचकामीलोटे - परशुराम, ता. खेड, औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाकडे दोन अग्निशमन बंब आहेत. मात्र, मागच्या केन केमिकलच्या आगीवेळी जसे वाहनात पाणी नसल्याने केन कंपनीची आग विझविण्यात झालेला उशीर नुकसानास कारणीभूत ठरला. तसाच आजचा प्रसंगही होता. कारण दोन वाहने एकाचवेळी कंपनीत आली. मात्र, दुसरे वाहन आगीस्थानी येऊन ते कार्यरत होण्यास अडथळा येत होता. जवळपास अर्धा तास ते वाहन कार्यरतच होत नव्हते. त्यामुळे आग विझविण्यास उशीर झाला.