शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

सावर्डेत दुकानांना आग; दहा लाखांचे नुकसान

By admin | Updated: August 9, 2014 00:33 IST

शॉर्टसर्किटने आग : तरुणांनी विझविली आग

सावर्डे : येथील बाजारपेठेतील तीन दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीचा भडका उडाल्यानंतर धुराचे प्रचंड लोळ पसरले. काही क्षण हाहाकार माजला. मात्र, अग्निशामक दलाची वाट न पाहता स्थानिक तरुणांनी जिवाची पर्वा न करता आग विझविण्यात यश मिळविले. तसेच दुकानांतील साहित्यही बाहेर काढले. ही घटना आज, शुक्रवारी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास घडली.सावर्डे बसस्थानकासमोर प्रिन्स फोटो स्टुडिओतून सकाळी धुराचे लोळ बाहेर येताना स्थानिकांनी पाहिले. तोपर्यंत ही आग शेजारील मोबाईल शॉपी, भैरव गारमेंट्स, अक्सा फूटवेअर या दुकानांपर्यंत पोहोचली. त्यानंतर ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत या आगीत तीन दुकानांतील बहुतांश साहित्य, वस्तू जळून खाक झाल्या होत्या. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आले. आग प्रथम प्रिन्स स्टुडिओत लागली आणि शेजारील दोन दुकानांना याची झळ बसली. स्टुडिओने पेट घेतल्यावर लगेचच धुराचे लोळ परिसरात पसरले. त्यामुळे ग्रामस्थांनी तेथे तत्काळ धाव घेतली. ग्रामस्थांपैकी जिजस बालन, नयन कुळ्ये, सूर्यकांत चव्हाण, भूषण देवळेकर, मीना जयस्वार, विनायक चव्हाण, सुनील पवार, राजू गोंंधळेकर, आदींनी जिवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी मोलाचे योगदान दिले. ग्रामस्थांनी अग्निशामक यंत्रणेची वाट न पाहता आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या भैरव गारमेंट्स, अक्सा फूटवेअर, सानिया बँगल मार्ट या दुकानातील साहित्य दुकानाबाहेर काढले.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन प्रिन्स फोटोचे विनोद चव्हाण, भैरव गारमेंट्सचे दिनेश भवरलाल माळी, अक्सा फूटवेअरचे मुस्तफा मेमन यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत केली. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट .