शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आंबेड खुर्द येथे घराला आग; तीन लाखांचे नुकसान

By admin | Updated: November 9, 2014 00:38 IST

संपूर्ण घर भस्मसात

 देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द तांबेवाडीतील राजाराम गीते व सुभाष गीते यांच्या मालकीच्या संयुक्त घराला काल, शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये संपूर्ण घर भस्मसात झाले. यामध्ये तीन लाख ११ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. आंबेड खुर्द तांबेवाडीतील राजाराम गीते व सुभाष गीते यांच्या संयुक्त घरात एकूण नऊ सदस्य राहतात. नेहमीप्रमाणे काल रात्री जेवण आटोपून ते झोपी गेले. मात्र, मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरातून धूर येऊ लागला. हे समजताच सर्वजण घराबाहेर पडले, असता घराचे छप्पर जळत असल्याचे दिसले. सर्वांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यामुळे वाडीतील ग्रामस्थ जागे झाले. यानंतर ग्रामस्थांनी पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने संपूर्ण घराला वेढा घातल्याने ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे ठरले. तब्बल पाच तास ग्रामस्थ व मंडळींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. आगीत संपूर्ण घरासह घरातील वस्तू, लाकडी सामान बेचिराख झाले. सरपंच बापू सुर्वे यांनीही घराला आग लागल्याचे समजताच धावत येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सर्वजण प्रसंगावधान राखून वेळीच घराबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीमध्ये राजाराम गीते यांचे एक लाख ४९ हजार रुपयांचे, तर सुभाष गीते यांचे एक लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाले. आगीची खबर संगमेश्वर तहसीलदार वैशाली माने व तलाठी माळी यांना कळविण्यात आली. त्यानंतर आज, शनिवारी सकाळी त्यांनी घटनास्थळी जाऊन जळीत घराची पाहणी करून पंचनामा केला. आगीत संपूर्ण घर भस्मसात झाल्याने गीते कुटुंबीयांसमोर कोठे राहायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)