शहरं
Join us  
Trending Stories
1
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
2
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
3
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
4
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
5
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
6
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
7
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
8
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
9
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
10
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
11
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
12
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
13
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
14
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
15
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
16
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
17
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
18
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
19
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
20
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा

थकबाकी भरा, तरच मतदार

By admin | Updated: November 2, 2014 23:31 IST

अनेकांची धावपळ : चिपळूण अर्बन बँकेच्या थकबाकीदारांना नोटीस

चिपळूण : योग्य मुदतीत थकीत रक्कम न भरल्यास सभासद मतदार यादीतून थकबाकीदारांची नावे कमी करावी, अशी सूचना को -आॅपरेटिव्ह डेप्युटी रजिस्ट्रार यांनी अर्बन बँकेला केली आहे. याची दखल घेऊन चिपळूण अर्बन बँकेने थकबाकीदारांना नोटिसा धाडल्या आहेत. थकीत रक्कम न भरल्यास त्यांना पुढील होणाऱ्या निवडणुकीमध्ये सहभागी होता येणार नाही. त्यामुळे अनेकांची धावपळ उडाली आहे. २९५ सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्च २०१५ पूर्वी होणार आहेत. या निवडणुका ४ गटात घेतल्या जाणार आहेत. अ गटात जिल्हा मध्यवर्ती बँक, सूतगिरणी, साखर कारखाने, तर ब गटात नागरी बँका, १० लाखापेक्षा जास्त भांडवल असलेल्या विकास संस्था, बिगरशेती पतसंस्था, १ कोटीपेक्षा जास्त ठेवी असलेल्या नोकरदार पतसंस्था, शासकीय अर्थसहाय घेतलेल्या प्रक्रिया व औद्योगिक संस्था, तालुका खरेदी- विक्री संघ, जिल्हा ग्राहक भांडार, ११ लाख लीटरपेक्षा कमी संकलन करणाऱ्या दूध संस्था व तालुका तसेच जिल्हा संघांचा यामध्ये समावेश आहे. क गटात १ कोटीपेक्षा कमी ठेवी, १० लाखांवरील भांडवल असणाऱ्या संस्था, १ कोटीपेक्षा कमी भांडवल असलेल्या नोकर पतसंस्था, १०० पेक्षा जास्त सभासद असणाऱ्या गृहनिर्माण संस्था, अर्थसहाय्य नसलेल्या औद्योगिक व प्रक्रिया संस्था, हातमाग विणकर, कृषी संस्था, १०० पेक्षा कमी सभासद असणाऱ्या उपसिंचन संस्था, पाणी वापर संस्था, १० लाखापेक्षा कमी भांडवलाच्या विकास सोसायट्या, दुग्ध कुक्कुटपालन, मत्स्य व पशुपालन संस्थांचाही यामध्ये समावेश आहे. ड गटात १००पेक्षा कमी सभासद असणाऱ्या गृहनिर्माण व अन्य संस्थांचा समावेश आहे. या चारही गटांच्या टप्प्याटप्प्याने निवडणुका होणार असल्याने चिपळूण अर्बन बँकेने याबाबतची पूर्वतयारी सुरु केली आहे. थकबाकीदारांना थकीत रक्कम किती आहे ती समजावी व त्यांना ती रक्कम भरण्यासाठी वेळ मिळावा, या हेतूने नोटीस काढून ३१ नोव्हेंबरपर्यंत रक्कम भरण्याबाबतची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, ही थकीत रक्कम न भरल्यास थकीत सभासदांची बँकेच्या मतदार यादीतील नावे कमी केली जाणार आहेत. चिपळूण अर्बन बँकेने काढलेल्या या नोटीसीमुळे अनेक थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. (वार्ताहर)लगबग सुरुजिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमांमुळे अनेक संस्थांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. लवकरच सहकार क्षेत्रात होणाऱ्या या निवडणुकीसाठी संस्थांमध्ये आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. अनेक इच्छुकांनी या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी कंबर कसली आहे. मार्च २०१५पूर्वी या निवडणुकीची प्रक्रिया आटोपणार असल्याने सध्या घाई सुरु आहे.