खेड : तालुक्यातील बिजघर शिंदेवाडी येथे शिवीगाळ लाकडी दांड्याने मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुरेश बाळू शिंदे यांच्यावर खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
गंगाराम बाबाजी शिंदे (७०, रा. बिजघर - शिंदेवाडी) व संशयित सुरेश बाळू शिंदे (५५, रा. बिजघर) या दोघांच्या घरांमध्ये असलेल्या रस्त्याच्या लगत मातीचा ढिगारा हाेता. हा ढिगारा उचलला नाही, याचा राग मनात धरून सुरेश शिंदे याने लाकडी दांड्याने मारहाण करून शिवीगाळ केली, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सुरेश बाळू शिंदे यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय येलकर करीत आहेत.