२. देशातील सर्व जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र शासनाने उचलली आहे. डोसचा स्वतंत्र साठा उपलब्ध करून महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम आयोजित करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूरज शेट्ये यांनी केली आहे. राज्य शासनाकडून होणारी मागणी, केंद्राकडून होणारा पुरवठा यात मोठी तफावत आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डोसचा पुरवठा करून द्यावा. त्यामुळे विद्यार्थ्यांना लसीकरणाचा फायदा होणार आहे
३. रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील ५,१६२ ग्रामस्थांचे आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. तसेच केंद्रातर्फे गावातील १० केंद्रांवर १,०८२ कोरोना प्रतिबंधित लसीच्या मात्राही प्राथमिक आरोग्य केंद्राने दिल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने यांच्या मार्गदर्शनाखाली जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरताडे यांच्या देखरेखीखाली गावातील दहा केंद्रांवर या लसीच्या मात्रा देण्यात आल्या. यामध्ये कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सीन या लसींचा समावेश होता.