शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

रौप्य महोत्सवी वर्षात कोमसाप देणार सात संमेलनांची मेजवानी

By admin | Updated: September 5, 2014 23:29 IST

संस्थाध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर व रौप्य महोत्सवी संमेलन समितीप्रमुख प्रा. एल. बी. पाटील यांनी घोषणा केली

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मध्यवर्ती संस्थेच्या सभेत रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कोकणच्या सात जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थाध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर व रौप्य महोत्सवी संमेलन समितीप्रमुख प्रा. एल. बी. पाटील यांनी केली. कोमसाप मध्यवर्ती संस्थेची सभा केळवे (पालघर) येथे पार पडली. यावेळी कोमसापचे संस्थापक मधुमंगेश कर्णिक, विश्वस्त निवृत्त न्यायमूर्ती भास्कर शेट्ये, अरूण नेरूरकर, कार्याध्यक्षा नमिता कीर, कार्यवाह प्रा. अशोक ठाकूर, प्रशांत परांजपे, संमेलन समितीप्रमुख रवींद्र आवटी, ठाणे जिल्हाध्यक्ष शशिकांत तिरोडकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश खटावकर, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गजानन म्हात्रे, पालघर जिल्हाध्यक्ष आर. एम. पाटील, ग्रंथ प्रकाशन समितीप्रमुख गौरी कुलकर्णी, केशवसुत स्मारक समितीचे गजानन पाटील, नलिनी खेर आदी उपस्थित होते.रौप्य महोत्सवी वर्षामध्ये कोकणच्या सातही जिल्ह्यांमध्ये जिल्हा संमेलनांचे आयोजन व विविध पातळ्यांवर साहित्य चळवळ जोमाने कार्यरत करण्यात येणार आहे. महिला, युवक, कुमार गटातील साहित्यप्रेमींकरिता विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. कथालेखन, काव्यलेखन कार्यशाळा, गझल काव्यशाळा, अभिवाचन कार्यशाळा अशा विविध माध्यमांव्दारे लेखन वाचन चळवळीला झळाळी आणण्याकरिता कृतीत्मक कार्यक्रमांची आखणी करण्यात आल्याचे कार्याध्यक्ष नमिती कीर यांनी यावेळी जाहीर केले. तसेच यानिमित्ताने कथालेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. रौप्य महोत्सवी वषार्निमित्त होणाऱ्या या संमेलनाना मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. रौप्य महोत्सवी वर्षामध्ये मुख्य संमेलन हे रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे वैशिष्ट्यपूर्ण व साहित्य मुल्यांची उंची गाठणारे लक्षवेधी संमेलन करण्याचे आवाहन मधुमंगेश कर्णिक यांनी केले. या सभेमध्ये नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याच्या कोमसाप बोईसर ५९च्या शाखेला मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)