शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांचे छत्र हरपलेल्या रुपालीची भरारी

By admin | Updated: June 15, 2016 00:05 IST

यशाचे कौतुक : मोलमजुरी करणाऱ्या आईचा चांगले शिक्षण देण्याचा निर्धार

चिपळूण : लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपले. आईने मोलमजुरी करुन मुलीला शिक्षण देण्याचा निर्धार केला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत रुपाली मंगेश हुंबरे ही विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेत ९१.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. तिचा आदर्श अन्य विद्यार्थ्यांनी घ्यावा. खेड तालुक्यातील धामणदिवी देऊळवाडी येथील मंदा यांचा विवाह कोतवली पाटीलवाडी येथील मंगेश यांच्याशी झाला. नोकरी नसल्यामुळे आपण स्वत: काही तरी केले पाहिजे म्हणून पुणे येथे जाऊन त्यांनी हातगाडीवर इडली विक्रीचा व्यवसाय सुरु केला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस सुखात जात असतानाच एक गोंडस मुलगी या घरात जन्माला आली. मुलगा किंवा मुलगी काय, याचा विचार न करता या कुटुंबाने तिचे चांगल्या प्रकारे पालनपोषण केले. काबाडकष्ट करून सुखी संसार सुरु होता. त्यातच दुसरीही मुलगी झाली. दरम्यान, हसत्याखेळत्या संसाराला ग्रहण लागले. मंगेश हे आजारी पडले. औषधोपचार करुनही नियतीने अखेर आपला डाव साधला. काही दिवसांनी त्यांचे निधन झाले. मंदा यांच्यावर आभाळचं कोसळलं. पती असेल तर साजं, तो नसेल तर अथांग सागरात उन्मळून पडलेले जहाज... अशी स्थिती मंदा यांची झाली. परंतु, या काळात नातेवाईकांनी धीर दिला. आपल्या दोन मुलींच्या भविष्याचं काय होणार, असा प्रश्न मंदा यांना भेडसावत होता. भाऊ एकनाथ बकवे यांनी आधार दिला. मंदा या आपल्या माहेरी धामणदिवी देऊळवाडी येथे आल्या. भाऊ व त्याच्या कुटुंबावर आपला भार नको, म्हणून मंदा यांनी घरकाम सुरु केले. मुलींना कोणत्याही परिस्थितीत शिक्षण द्यायचं, असा त्यांनी निर्धार केला. मोठी मुलगी रुपाली हिला गावातीलच शाळेत दाखल केले. लहानपणापासूनच रुपाली हुशार होती. आईच्या कष्टाचे चीज करायचे ही इच्छा तिने मनी धरली. चांगला अभ्यास करुन पास व्हायचे, असे तिने ठरवले. मुलीच्या शिक्षणासाठी काहीही कमी पडू द्यायचे नाही, या भावनेतून मिळेल ते काम मंदा या करीत होत्या. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर रुपाली हिने पेढे परशुराम येथील आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने रुपालीला मदत करण्यासाठी भारतीय समाज सेवा केंद्र, चिपळूणतर्फे विशेष आर्थिक सहाय्य देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. तिला शाळेसाठी लागणारे साहित्य व पुस्तके या संस्थेने दिली. दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे, असा निर्धार करुन रुपाली अभ्यास करीत होती. तिने केलेल्या अभ्यासाचे चीज झाले. दहावीच्या परीक्षेत रुपाली ९१.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात द्वितीय आली. तिची दुसरी बहीण मनाली हिने नववीत प्रवेश घेतला आहे. सध्या मामा एकनाथ बकवे याने घराच्या बाजूलाच मंदा यांना एक खोली दिली आहे. आपल्या दोन्ही मुलींचे भविष्य उज्वल व्हावे, अशी अपेक्षा मंदा यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले असले तरी आईने काबाडकष्ट करून आम्हाला शिक्षण देण्याचा जो वसा घेतला आहे, तिची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी अभ्यास करुन पुढील जीवनातही मी चांगले गुण मिळवणार आहे. आईने केलेल्या कष्टाला मामाचीही साथ मिळाली, त्यामुळेच मी हे यश मिळवू शकले. - रूपाली हुंबरे