शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसात २ हजार ७९७ शेतकऱ्यांचे अर्ज

By admin | Updated: May 27, 2016 23:23 IST

रत्नागिरी तहसील : खरीप पीक कर्जाचे परिपूर्ण प्रस्ताव

रत्नागिरी : खरीप पीक कर्ज वाटप अभियानाने रत्नागिरी तालुक्यात चांगलीच गती घेतली असून, आजपर्यंत अवघ्या पाच दिवसांत २७९७ शेतकऱ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव विविध बँकांकडे सादर करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी दिली. सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या तालुकास्तरीय समितीची आढावा बैठक झाली.जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी नियोजन केल्यानुसार तालुकास्तरीय समितीचे काम सुरू झाले आहे. त्याकरिता १८ मे रोजी तालुकास्तरीय समितीतील सर्व सदस्यांची सभा घेण्यात आली. यावेळी तहसीलदार सुकटे यांनी या अभियानांतर्गत संवेदनशीलपणे कार्यवाही करण्याचे निर्देश सर्वांना दिले. १९ रोजी या अभियानासंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. यात कृषी सहायक, कृषीसेवक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व विविध सेवा सहकारी सोसायटीचे सचिव अशा १०८ जणांची क्षेत्रिय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर २० व २३ रोजी आढावा बैठका घेण्यात आल्या.गुरूवारी पुन्हा या अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी तालुकास्तरीय समितीची आढावा बैठक बोलावली. यावेळी विविध राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील २७९७ शेतकऱ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव बँकांकडे सादर करण्यात आले. केवळ पाच दिवसांत तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेला भरघोस प्रतिसाद दिला. अर्ज सादर करण्यासाठी असलेली २३ मेपर्यंतची मुदत जिल्हाधिकाऱ्यांनी ३० मेपर्यंत वाढवून दिली आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न बँकांकडून व्हावा, असे आवाहन तहसीदार सुकटे यांनी याप्रसंगी केले. सध्या क्षेत्रिय अधिकारी शेतकऱ्यांमध्ये खरीप पीक कर्ज योजनेसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जागृती करीत आहेत. तलाठ्यांना या योजनेसाठी मोफत सातबारा देण्याच्या सूचना तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी दिल्या आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत आता ३० मे पर्यंत वाढविण्यात आली असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)कामात सुसूत्रता : जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांचे नियोजननूतन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्व विभागातील कामांकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. शासकीय कार्यालयाचा कारभार पारदर्शक असला पाहिजे, या हेतूने त्यांनी प्रत्येक विभागात सुसूत्रता आणण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार त्यांनी कामांचे नियोजनही केले आहे.