शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

घरोघरी फिरुनच सांभाळतो कुटुंबाचा डोलारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 23:39 IST

जयेंद्र राऊत : अनेकांनी दिली ‘झोळीवाले राऊत’ अशी उपमा; तरीही दिले मुलांना चांगले शिक्षण

आवाशी : फुगे विकून मी कसेबसे सातवीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र, परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेणे जमले नाही. मात्र, तेव्हापासूनच लोकांच्या घरोघरी फिरून विविध वस्तूंच्या विक्रीतून उदरनिर्वाह करणे हे आपल्या नशिबी आले व पुढे तोच आपला प्रमुख व्यवसाय झाला. या व्यवसायाला न्याय देत आज तब्बल ३८ वर्षे हे काम आपण मनापासून करत असून, संपूर्ण कुटुंबाचा डोलारा आपण याच कामातून सांभाळत असल्याचा अभिमान वाटतो, असे वयाच्या ५६ व्या वर्षीही गावोगावी वस्तू विक्री करणारे जयेंद्र राऊत सांगतात.जयेंद्र महादेव राऊत हे खेड तालुक्यातील आवाशी गावातील (मधलीवाडी) गृहस्थ. तीन वर्षांपूर्वी ते मुंबई सोडून पत्नी सविता सोबत गावी आले. गावी आल्यापासून राऊत हे सकाळी ९ वाजले की, काखेला जुन्या पद्धतीची झोळी लावून घराबाहेर पडतात. भेटणाऱ्या प्रत्येकाला ते ‘ओम नम: शिवाय’ असा नमस्कार घालणे कधीही चुकवत नाहीत. जुन्या पद्धतीची झोळी लावून गावोगावी फिरणाऱ्या राऊतांना अनेकांनी ‘झोळीवाले राऊत’ अशी उपमाही दिली आहे. त्यांच्या या फिरत्या व्यवसायाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा जीवनपटच समोर आला.जयेंद्र राऊत हे मूळ जरी आवाशी गावचे असले, तरी त्यांचे बालपण व तरुणपण हे मुंबईतील मालाड येथे गेले. ते दीड वर्षाचे असताना त्यांच्यावरील आईचे छत्र हरपले. त्यानंतर वडिलांनीच त्यांचा सांभाळ केला. ७ वीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्यांनी फुगे विकून पूर्ण केले. त्यामुळे त्यांना मुंबईतच पडेल ते काम करण्याची सवय लागली. वयाच्या अठराव्या वर्षी मुंबईत त्यांना एका माणसाने ‘इमिटेशन ज्वेलरी’च्या कारखान्यात कामाला ठेवले. या कारखान्यात काम करण्याआधी त्यांनी मच्छी विकणे, भाजी विकणे अशी कामेदेखील केली. या कारखान्यामध्ये बनविलेले बेन्टेक्सचे दागिने घरोघरी जावून विकण्याचे काम जयेंद्र हे करत असत. याचबरोबर विविध प्रकारचे कपडे, अगरबत्ती यांचीही विक्री ते याच्या जोडीने करत असत.याच व्यवसायावर त्यांनी आपला उदरनिर्वाह चालू केला. वडील गेल्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी लग्न केले. आपल्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह ते याच व्यवसायावर भागवत असत. याच व्यवसायाच्या आधारे त्यांनी आपल्या मुलाला पदवीधर तर मुलीला १२ वीपर्यंत शिक्षण दिले. आज त्यांची दोन्ही मुले विवाहित असून, नोकरी करत आहेत. मात्र, राऊत यांना लागलेली या व्यवसायातील गोडी ही गावी आल्यानंतरही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर गावातच त्यांनी इमिटेशन ज्वेलरी बनविण्याचा कारखाना सुरु केला. ते येथे पत्नीच्या मदतीने वेगवेगळे दागिने बनवतात. हे दागिने आजही ते पायी प्रवास करून घरोघरी जावून विकतात. आजही त्यांनी आपला जुना व्यवसाय थांबविलेला नाही. आजही त्यांचा हा दिनक्रम सुरूच आहे. (वार्ताहर)‘‘मी दीड वर्षाचा असताना माझी आई हे जग सोडून गेली. मला आईला पाहिलेले नीटसे आठवत देखील नाही. तेव्हापासून वडिलांच्या मायेखाली वाढलो. आम्ही एकूण तीन भावंडे, तेव्हाची आर्थिक परिस्थिती बेताचीच. वयाच्या ११ व्या वर्षी मी मुंबईत फुगे विकायचो. त्यावेळी मी इयत्ता ५ वीत शिकत होतो. बालडोंगरी प्राथमिक शाळा, मालाड येथे ७ वीपर्यंत शिक्षण घेतले. ७ वीपर्यंत शिकत असताना मी फुगे विकायचो. घरोघरी जावून वस्तू विकून उदरनिर्वाह करण्याचेच आपल्या नशिबी असल्याने आपण ती स्वीकारले.’’