शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

फटकरे कुटुंबियांचे कर्तेच हरपले

By admin | Updated: July 11, 2016 00:42 IST

लोवले गाव हळहळला : अजयचं कुटुंब झालं पोरकं

सचिन मोहिते ल्ल देवरुख आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी सेंट्रिंगचे काम स्वीकारले होते. या कामावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. मात्र, नियतीच्या मनात वेगळाच विचार चालला होता. संगमेश्वर तालुक्यातील कुरूधुंडा येथील शौचालयाच्या टाकीचे काम करताना गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामध्ये लोवले फटकरेवाडीतील ‘त्या’ फटकरे कुटुंबियांचे कर्तेच हरपले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव हळहळला. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या अजय फटकरे यांचा अवघ्या दोन वर्षांचा लहानगा त्यांच्या जाण्यामुळे पोरका झाला आहे तर अशोक फटकरे यांच्या मुलाला अकरावीपासून पुढील शिक्षणाचा खर्च आता स्वत:लाच करावा लागणार आहे. कुरुधुंडा गावात घेतलेले काम शेवटच्या टप्प्यात आलं होतं आणि केवळ शौचालयाच्या टाकीच्या स्लॅबच्या फळ्या काढण्यासाठी त्या टाकीत उतरलेल्या तिघांना प्राणाला मुकावे लागले. वीस फूट खोल असणाऱ्या या टाकीत गुदरमल्याने ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी १० च्या सुमारास घडली होती. या टाकीचे काम हे नजीर मुजावर यांनी घेतले होते. त्यांच्याकडे फटकरे हे काम करत असत. अशोक फटकरे हे स्वत:देखील छोटी-मोठी कामे घेत असत. त्यांच्याकडे अजय फटकरे हा कामगार म्हणून काम करत असे. नजीर मुजावर आणि अशोक फटकरे हे कामात एकमेकांना सहकार्य करत असत. अशोक फटकरे (४०) हे आपली रोजीरोटी सेंट्रिंग व्यवसायावरच चालवत होते. मात्र, त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, ११ वीत शिकत असलेला एक मुलगा आणि बारावी उत्तीर्ण झालेली मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुषच हरपल्याने कुटुंबियांचा आधारच निखळला आहे. अशोक फटकरे यांच्याबरोबर गेली तीन-चार वर्षे अजय फटकरे काम करत होता. अजय फटकरे (३०) याला सार्थक नावाचा एक लहानगा मुलगा असून, तो पहिली इयत्तेत शिकत आहे. सार्थक हा निरागस वयातच पोरका झाला आहे. अजय हा आपल्या आई-वडिलांसह छोट्याशा घरात राहात होता. त्याने नवीन घरासह कुटुंबियांसाठी मोठी स्वप्ने पाहिली होती. मात्र, ती स्वप्ने आता अपूर्णच राहिली आहेत.