शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना महामारीवर लिंबू, संत्री, मोसंब्याचा उतारा! दरही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : संत्री, मोसंबी, लिंबूमध्ये असलेले ‘क’ जीवनसत्त्व रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करते. या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : संत्री, मोसंबी, लिंबूमध्ये असलेले ‘क’ जीवनसत्त्व रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करते. या फळांच्या सरबत सेवनामुळे अशक्तपणा दूर होतो. शरीरातील शक्ती वाढविण्यास फळे फायदेशीर तर ठरतातच, शिवाय त्वचा, केस, डोळे यासाठीही फायदेशीर ठरते. कोरोना रुग्णवाढीचा धसका नागरिकांनी घेतला असून रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वपरीने प्रयत्न करीत आहे. त्यामुळे बाजारात सध्या मोसंबी, संत्री, लिंबूला सर्वाधिक मागणी होत आहे.

लिंबूवर्णिय फळांमधील अ‍ँटिबॅक्टेरियल व अ‍ॅटिऑक्सिडंट गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. शिवाय पोटासंबंधी समस्यांवर गुणकारी असून मोठ्या प्रमाणावर फायबर असल्याने या फळांचा वापर प्राचीन काळापासून सुरू आहे. ‘क’ जीवनसत्त्वामुळे अनेक रोगांचे निवारण होत असल्याने प्राधान्याने या प्रकारच्या फळांना मागणी वाढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा धसका सामान्यांनी घेतला असल्यानेच फळांना मागणी होत आहे.

मुंबईतून आवक

रत्नागिरीत येणारी फळे ही बहुतांश वाशी मार्केट व कोल्हापूर येथून येत आहेत. संत्री, मोसंबी, लिंबू वाशी येथून येत असली तरी, कोल्हापुरातूनही लिंबाची आवक होत आहे. पुढच्या आठवड्यापासून रमजान मास सुरू होत असल्याने विक्रेत्यांनी मागणी वाढविली आहे.

थकवा दूर होण्यास मदत

संत्री, मोसंबी, लिंबू ही लिंबूवर्णिय फळे असून त्यामध्ये पॅक्टीन, ‘क’ जीवनसत्त्वाबरोबरच इतर पोषक तत्त्वे असल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करण्यासाठी मदत करतात. हृदयरोग होण्यापासून बचाव करत असल्याने यांचे सेवन फायदेशीर ठरत आहे. शिवाय वजन कमी करण्यासाठी मोसंबीचा फायदा होतो. थकवा घालवित असताना दिवसभर स्वत:ला ताजेतवाने ठेवण्यासाठी सकाळी उपाशीपोटी लिंबूपाणी सेवन करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ताप आलेल्या रुग्णांना तरी मोसंबी ज्यूस आवर्जून दिला जातो. त्यामुळे या फळांचा विशेष खप होत आहे. कोरोना काळात तर सर्वाधिक मागणी होत आहे.

सर्दी, घसादुखी किंवा तत्सम् अ‍ॅलर्जी दूर करण्यासाठी ‘क’ जीवनसत्त्वावर भर दिला जातो. काहीवेळा ‘क’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या रुग्णांना दिल्या जातात. मात्र गोळ्या खायला नको असणारे फळे खाऊन जीवनसत्त्वे मिळवितात.

- डॉ. निशिगंधा पोंक्षे

रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याच्या नादात फळे खातानाही योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा योग्य मात्रा असलेली ‘क’ जीवनसत्त्वाची गोळीही फायदेशीर ठरते. आवडत असणारी फळे जरूर सेवन करावीत.

- डॉ. अनिरुध्द फडके