शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बहि:स्थ विद्यार्थी प्रवेशप्रक्रिया १६ सप्टेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:29 IST

रत्नागिरी : दहावी, बारावी परीक्षेसाठी बहि:स्थ विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरण्याकरिता दि. १६ सप्टेंबर ते दि. १२ ऑक्टोबरअखेर ...

रत्नागिरी : दहावी, बारावी परीक्षेसाठी बहि:स्थ विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरण्याकरिता दि. १६ सप्टेंबर ते दि. १२ ऑक्टोबरअखेर ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सूचना राज्य मंडळातर्फे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२२ मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या बसण्यासाठी १७ नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना दि.१६ सप्टेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार असल्याची सूचना राज्य मंडळातर्फे करण्यात आले आहे.

राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि शुल्क भरायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्क भरल्याची पावती दोन प्रतीत, मूळ कागदपत्रे दि. १७ सप्टेंबर ते दि. १४ ऑक्टोबर या कालावधीत निवडलेल्या शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजात जमा करायची आहे. विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्काची पावती, मूळ कागदपत्रे आणि विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे दि. १८ ऑक्टोबर रोजी जमा करायचे आहेत.

कोरोनामुळे दहावी आणि बारावीचा निकाल जुलै-ऑगस्टमध्ये जाहीर झाला असला तरी ऑनलाइन अर्ज नोंदणीत शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याच्या दाखल्यावरील तारीख ३१ ऑगस्ट अशी ग्राह्य धरण्यात यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा बदल केवळ मार्च २०२२ या परीक्षेपुरता लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वयासाठी अंतिम तारीख दि. ३१ जुलै ग्राह्य धरण्यात येणार आहे, असे राज्य मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.