शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

गावविकासासाठी विस्तार अधिकारी

By admin | Updated: July 18, 2016 00:02 IST

शिक्षण विभाग : इतर खात्यांचे अधिकारी गुरुजी

रत्नागिरी : शैक्षणिक विकासाच्या नावाखाली इतर खात्याच्या अधिकाऱ्यांना गुरुजींची भूमिका निभावावी लागत असतानाच दुसरीकडे शिक्षण विभागातील विस्तार अधिकाऱ्याना गाव विकास आराखड्यासाठी जुंपण्यात आले आहे. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. एक दिवस शाळेसाठी या उपक्रमाची जोरदार चर्चा होत आहे. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांमध्ये जाऊन अध्यापनाचे पवित्र काम केले. त्यानंतर वर्ग-१ व वर्ग-२ चे अधिकारी शाळेवर जाणार असताना काही शाळांमध्ये तलाठ्यांनाही धाडण्यात आले होते. सर्वच ग्रामपंचायतींमध्ये आमचा गाव, आमचा विकास हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये चौदाव्या वित्त आयोगाअंतर्गत गावचा पुढील चार वर्षांचा आराखडा बनवला जात आहे. त्यादृष्टीने गाव पातळीवर सर्वच विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये गावातील साकव, रस्ते बंधाऱ्यांसह अन्य कामांचाही समावेश आहे. तयार करण्यात येणारा विकास आराखडा ग्रामसभेमध्ये मंजूर करण्यात येणार आहे. शिक्षकांवर अविश्वास दाखवून एक दिवस शाळेसाठी उपक्रम सुरू करून शिक्षण विभागातील वातावरण गढूळ झाले आहे. त्यामुळे शिक्षकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच आता प्रशासनाकडून शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांवर आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे. शैक्षणिक काम करीत असताना गावच्या विकासाचे ओझेही विस्तार अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. एकीकडे शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी अन्य खात्याच्या अधिकाऱ्यांना शैक्षणिक काम दिले जात असतानाच शिक्षण खात्यातील विस्तार अधिकाऱ्यांना शैक्षणिक काम बाजूला ठेवून गाव विकास आराखड्याचे काम देण्यात आले आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे ५६ विस्तार अधिकारी विकास आराखडा तयार करण्यासाठी जुंपण्यात आले आहेत. त्यामुळे इतर खात्याच्या अधिकाऱ्यांना शैक्षणिक काम द्यायचे आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अशैक्षणिक कामे देऊन शासन नक्की काय साध्य करणार आहे, अशी जोरदार चर्चा शैक्षणिक क्षेत्रात सुरु आहे. (शहर वार्ताहर)