शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महानिर्मिती प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ

By admin | Updated: February 12, 2016 23:45 IST

प्रकल्पग्रस्त उमेदवारांना दिलासा : सेवासमाप्तीऐवजी सेवावाढ देण्याची सूचना

शिरगाव : प्रकल्पग्रस्त उमेदवारांची महानिर्मिती कंपनीत नोकरीसाठी सुरु असलेली धडपड आणि व्यवस्थापनाने घेतलेले अन्यायकारक निर्णय याबाबत ऊर्जामंत्र्यांशी चर्चा घडवून आणली. येत्या दोन-चार दिवसात बीटीआरआय प्रशिक्षणार्थींना सेवासमाप्तीऐवजी लेखी पत्राद्वारे सेवावाढ मिळणार आहे. प्रकल्पासाठी भूसंपादन केल्यानंतर केवळ प्रकल्पग्रस्त दाखला घेतलेल्या बेरोजगारांना महानिर्मिती कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून घेण्यात आले. आयटीआय समकक्ष असलेल्या या योजनेत महानिर्मितीने केवळ प्रकल्पग्रस्तांची निवड केली. भविष्यात त्यांनी भरतीपूर्व परीक्षा पास होऊनच महानिर्मिती कंपनीत सेवेत दाखल व्हावे, अशी रचना केली. प्रशिक्षण संपल्याचे सांगून नियमानुसार १० मार्चला त्यांची सेवा समाप्ती होणार होती. तथापि, अशा प्रशिक्षणार्थींच्या जीवनाचे पुढे काय? हे प्रकल्पग्रस्त उमेदवार असल्याने त्यांना मानवतावादी दृष्टीने पूर्वीच्या प्रशिक्षणार्थींप्रमाणे परीक्षा पास होईपर्यंत कमी करु नये, त्यांची महानिर्मिती कंपनीतून हकालपट्टी करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अखेर संघटित झालेल्या बीटीआरआय प्रशिक्षणार्थीना घेऊन पोफळीचे माजी सरपंच चंद्रकांत सुवार, प्रताप शिंदे यांनी भाजपचे नेते बाळ माने यांच्यासमोर हा विषय मांडला. तातडीने मुंबईला जाऊन माने यांच्या मध्यस्थीने ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे, महानिर्मितीचे व्यवस्थापन यांच्यासमोर ही व्यथा मांडण्यात आली. आम्हाला रोजगारापासून वंचित ठेवू नका. पात्र ठरेपर्यंत प्रशिक्षणार्थी ठेवा. मात्र, भरतीमध्ये ५० टक्के आरक्षण ठेवा, असा सूर यावेळी पुढे आला. यापूर्वी या कंपनीत प्रकल्पग्रस्त अनेक वर्ष कार्यरत होते. त्यांनी कौशल्यपूर्ण सेवा बजावल्याचे यावेळी सांगण्यात आले. अखेर त्यांच्या प्रशिक्षण कालावधीला वाढ मिळाली. मात्र, लेखी आदेश दोन दिवसात पाठवतो, असे सांगण्यात आले. आज दोन दिवस ४० प्रशिक्षणार्थी आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. (वार्ताहर)