शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

हापूसची निर्यात २0 टक्केच

By admin | Updated: May 27, 2016 23:21 IST

फक्त १०० टन आंबाच परदेशी बाजारपेठेपर्यंत पोहोचला आहे. कमी पर्जन्यवृष्टीमुळे पुनर्मोहोर प्रक्रियेमुळे उत्पादन घटले.

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन घटले आणि त्याचा परदेशी निर्यातीला मोठा फटका बसला आहे. राज्यभरातून एक हजार टन आंबा उत्पादनाचे उद्दिष्ट असताना केवळ ६०० टन आंबा महाराष्ट्रातून पाठवण्यात आला. कोकणातून५०० टन हापूस निर्यातीचे उद्दिष्ट असताना फक्त १०० टन आंबाच परदेशी बाजारपेठेपर्यंत पोहोचला आहे.कमी पर्जन्यवृष्टीमुळे पुनर्मोहोर प्रक्रियेमुळे उत्पादन घटले. गतवर्षी अवकाळी पावसामुळे आंबा पिकावर परिणाम झाला होता. यावर्षी पीक चांगले होईल अशी अपेक्षा असताना आंबा बागायतदारांची निराशा झाली. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत हवामानात सातत्याने बदल होत राहिले. पिकासाठी केलेला खर्च, त्या तुलनेत उत्पादनातील घट शिवाय कोसळलेले बाजारभाव यामुळे बागायतदार शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. गतवर्षीपासून शासनाकडून मँगोनेट प्रक्रिया राबविण्यात आली. युरोपिय देशांनी गतवर्षी आंबा निर्यातीची दारे उघडली असली तरी त्या निर्यातीसाठी गरजेची असलेली उष्णजल प्रक्रिया मात्र उशिरापर्यंत लागू झाली नाही. त्यासाठी बाष्पजल प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ती प्रक्रिया केवळ वाशी (मुंबई) येथेच होते. आधीच आंबा कमी आणि त्यात ही प्रक्रिया करण्यासाठी वाशीला जावे लागणार असल्याने बागायतदारांनी त्याकडे बऱ्याचअंशी पाठ फिरवली. (प्रतिनिधी)अवकाळीने नुकसानमँगोनेटद्वारे आंबा निर्यातीसाठी ३१ निर्यातदार तयार होते. या अभियानांतर्गत एक हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट होते. मात्र, ६०० टन आंबाच (सर्व प्रकारचा मिळून) निर्यात करण्यात आला आहे. कोकणातील हापूसला चांगली मागणी होती.