शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

कोंडिवली धरणाची गळती रोखण्यासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंगचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST

khed-photo52/53/54 खेड तालुक्यातील कोंडिवली येथील लघू पाटबंधारे विभागाच्या धरणाची बेंटोनाइट ग्राउंटिंग करून गळती बंद करण्याचे काम सुरू आहे. लाेकमत ...

khed-photo52/53/54

खेड तालुक्यातील कोंडिवली येथील लघू पाटबंधारे विभागाच्या धरणाची बेंटोनाइट ग्राउंटिंग करून गळती बंद करण्याचे काम सुरू आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड : मातीच्या धरणांची गळती रोखण्यासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंगचा प्रयोग पाटबंधारे विभागाने जिल्ह्यात सुरू केला आहे. तालुक्यातील कोंडिवली धरणाच्या गळती लागलेल्या भिंतीवर जिल्ह्यातील पहिला प्रयोग सुरू करण्यात आला आहे.

जुलै, २०१९ मध्ये चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील मातीचे धरण फुटण्याची दुर्दैवी घटना घडली होती. या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील कोंडिवली येथील धरणाला गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती सुरू असते. धरण फुटीच्या छायेखाली ग्रामस्थांना वावरावे लागते. या धरणाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने दिली आहेत, तर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरण फुटीची शक्यता फेटाळून लावली होती. मात्र, धरणाच्या भिंतीची दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. जिल्ह्यातील सर्वच मातीच्या धरणांची पाहणी करून शासनाला अहवाल देण्यात आला होता.

सद्यस्थितीत कोंडिवली धरणासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंग तंत्रज्ञान वापरून दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. यासाठी शासनाने ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. बेंटोनाइट या मातीच्या पावडरचा वापर या धरण दुरुस्तीसाठी करण्यात येणार आहे. यासाठी धरणाच्या भिंतीला वरील बाजूने १० ते २५ मीटर खोल छिद्र पाडून यामध्ये पाणी टाकून बेंटोनाइटचे जाडसर मिश्रण प्रेशरने सोडण्यात येते. धरणाच्या भिंतीत अंतर्गत असलेली छिद्रे या मिश्रणाने भरली जाऊन पाण्याची गळती रोखण्यात मदत होते. या पद्धतीने सुमारे ७० टक्के पाण्याची गळती रोखली जाईल, असा अंदाज ठेकेदार कंपनीचे राहुल पाटील यांनी व्यक्त केला. या तंत्रज्ञानाने मातीच्या धरणांची काही प्रमाणात गळती रोखली जाईल, तर भीतीच्या छायेखाली वावरणाऱ्या ग्रामस्थांनाही थोडासा दिलासा मिळेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

काेट

बेंटोनाइट ग्राउंटिंगमुळे मातीच्या भिंती असलेल्या धरणांची पाणी गळती रोखण्यासाठी कोंडिवली येथे सुरू केले आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे छिद्र असलेल्या धरणाची भिंत सुरक्षित होईल, तसेच पाण्याची गळती रोखण्यास निश्चितच मदत होईल.

- गोविंद श्रीमंगले, पाटबंधारे उपअभियंता, खेड