शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

परीक्षा कामकाजावर बहिष्कार

By admin | Updated: February 16, 2016 00:18 IST

बोर्डाला निवेदन : जिल्हा विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीमार्फत आंदोलन

खालगाव : रत्नागिरी जिल्हा विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीमार्फत कोकण बोर्डावर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये एच. एस. सी. बोर्ड कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. सन २०१४-१५च्या संचमान्यतेच्या प्रती सर्व विनाअनुदानित शाळांना त्वरित मिळाव्यात, वैयक्तिक मान्यतेच्या त्रुटी दूर करण्याचा कालावधी वाढवावा, पात्र माध्यमिक शाळांच्या याद्या त्वरित लावाव्यात, यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या.महाराष्ट्रात कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा, तुकड्या, कनिष्ठ महाविद्यालये यांचा शब्द काढून सन २०१५-१६ साली लागणारा नियतव्यय स्वतंत्ररित्या उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबत फेब्रुवारी २०१४ला शासन निर्णय झाला, या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु मूल्यांकनाचे कामकाज पूर्ण करण्यास किमान सात वेळेस दिरंगाई झाली. त्यासाठी आतापर्यंत १६३ आंदोलने झाली. यासाठी शिक्षणमंत्री सकारात्मक आहेत. तसेच सहकारमंत्री, अर्थमंत्री, गृहराज्यमंत्री यांनीही हा प्रश्न मिटवू, असे सांगितले होते.मागण्यांची अद्याप पूर्तता झाली नसल्याने एच. एस. सी. कामकाज बहिष्काराबाबत बोर्डाच्या अध्यक्षांना निवेदन दिलेले होते. गेल्या अनेक वर्षांपासून कोकण बोर्डाचा एच. एस. सी.चा निकाल महाराष्ट्रात अव्वल आहे. यामध्ये कोकण विभागातील विनाअनुदानित शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, कोकण विभागातील एकही उच्च माध्यमिक शाळा, तुकडी अनुदानाला पात्र ठरली नाही. शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेच्या त्रुटीअभावीच या शाळा अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे अशा शाळांतील विनाअनुदानित शिक्षकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशा अवस्थेत बोर्डाने त्यांना परीक्षा कामकाज लादले तर नैतिक व वैधानिकदृष्ट्या ते योग्य ठरणार नाही. या सर्व बाबींचा विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृ ती समिती निषेध करते. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर बोर्डाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा दिला आहे.यावेळी कोकण बोर्ड अध्यक्ष शकुंतला काळे, शिक्षण अधिकारी किरण लोहार, सी. एस. गावडे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी समितीचे रत्नाकर माळी, कुराडे, देसाई, राडे, एस. व्ही. वाडकर, घागरे, गवई, जाधव, प्रसादे व इतर शिक्षक हजर होते. (वार्ताहर)बहिष्कार मागे घ्या : अडथळा दूर होणारशिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी संचमान्यतेच्या प्रती त्वरित देण्याची शिक्षकांची मागणी यावेळी मान्य केली आहे. यामुळे संस्था रोस्टर पूर्ण करण्याचा मोठा अडथळा दूर होणार आहे. यावेळी बोर्ड परीक्षा कामकाजावरील बहिष्कार मागे घेण्याची विनंती आंदोलनकर्त्या शिक्षकांना करपरीक्षेवर परिणामशिक्षकांनी परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकल्यास त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. तसेच परीक्षेच्या कामकाजावरही परिणाम होणार आहे.ण्यात आली.