शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

असगोलीला वगळल्याने भाजपचा जोर वाढला

By admin | Updated: September 23, 2016 00:38 IST

गुहागर नगरपंचायत : विनय नातू यांच्या प्रयत्नांना यश

संकेत गोयथळे -- गुहागर नगरपंचायतीतून असगोली गाव वगळण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केली असून, लवकरच याची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. या बदलामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमधील राजकीय वादामध्ये पहिल्यांदाच भाजपने जोर मारला असून, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटतील, अशी चर्चा रंगू लागली आहे.नगरपंचायत स्थापनेसाठी गुहागर शहराची लोकसंख्या कमी पडत असल्याने दोन हजार लोकसंख्या असलेले लगतचे असगोली गाव नगरपंचायतीला जोडण्याचा प्रस्ताव तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी मांडला. मंत्रीपदाच्या जोरावर ६ आॅक्टोबर २०१२ रोजी गुहागर नगरपंचायत स्थापन झाली. याचवेळी असगोली गावामध्ये येणाऱ्या मांडके बिल्डर्सच्या प्रोजेक्टसाठी नगरपंचायत स्थापन होत असल्याची चर्चा होती. याला ग्रामस्थांनी कडाडून विरोधही केला. अखेर नगरपंचायत स्थापन होऊन असगोली गावाचाही त्यात समावेश करण्यात आला. भाजपनेही राजकीय खेळी करत असगोलीमधून माजी सरपंच गजानन वेल्हाळ यांच्यासह गुहागर शहरातील उमेदवार देऊन राष्ट्रवादीवर उलटी खेळी करण्याचा प्रयत्न केला. यानंतरही ग्रामस्थांनी विरोध करत लोकवर्गणी जमा करुन मुंबई उच्च न्यायालयात रिटपिटीशन दाखल केले, याची अद्याप सुनावणी झालेली नाही. सत्ता बदलानंतर माजी आमदार भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांनी वरच्या स्तरावर हालचाली सुरु केल्या. अखेर याला यश आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर सही केली आहे. आता हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे जाऊन याबाबतची अधिसुचना लवकरच जारी होईल, असे सांगितले जात आहे. काही भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तर असगोलीमध्ये घराघरामध्ये जाऊन हे आम्ही करुन दाखवले, असे सांगून राजकीय श्रेय घेण्याची सुरुवातही केली आहे.भविष्यात काही महिन्यांवर गुहागर पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. नगरपंचायत स्थापन झाल्याने शहरातील जनतेच्या नियमांच्या गुंत्यामुळे वाढलेला प्रशासकीय अडचणी लक्षात घेता भाजपला याचा फायदा होईल, असे वाटत आहे. यातच भाजपचा एकतर्फी वर्चस्व असलेल्या असगोली गावाच्या मतदानाचा पंचायत समितीच्या निवडणुकीतही फायदा होईल, असे राजकीय गणित आहे. भविष्यात या बदलत्या घडामोडीमुळे प्रत्यक्ष कोणाला फायदा होईल, ही नंतरची प्रक्रिया असली तरी तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी नगरपंचायत स्थापनेसाठी असगोली गावाचा समावेश करून चांगलीच बाजी मारली. मंत्रीपदी असताना नगरपंचायत स्थापन झाल्याने आपल्या अधिकारात स्थापनेपूर्वी व त्यानंतर काही कोटींचा निधी मंजूर केला. याचवेळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहरांना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे प्रस्तावित होते. मात्र, यानुसार गुहागर नगरपंचायत स्थापन होण्यासाठी आणखी काही वर्षाचा कालावधी लागला असता व त्यावेळी मंत्रीपद असेल नसेल हा विचार करुन आधीच नगरपंचायत स्थापन करुन एकप्रकारे राजकीय बाजी मारली. गेली काही वर्षे मूग गिळून गप्प बसलेले डॉ. विनय नातू व भाजप मंडळींना गुहागर नगरपंचायतीमधून असगोली गाव वगळल्याने सत्तेचा राजकीय रिचार्ज मिळून पंचायत समिती निवडणुकीवर याचे पडसाद उमटताना दिसतील.