शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

पुनर्वसित प्रकल्पग्रस्तांचे भोग सुरूच!

By admin | Updated: August 8, 2014 00:43 IST

पाटण तालुका : गावठाण भागातील इमारतींचे पत्रे-खिडक्या गायब

ढेबेवाडी : प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधांमधील प्राथमिक शाळंच्या इमारती बांधून सात वर्षे पूर्ण झाली़ या इमारतींमध्ये अध्यापनाचे काम चालू होण्यापूर्वीच या शाळा इमारतींचे पत्रे, खिडक्या दरवाजे गायब झाले़ तर काही गावठाणात शाळेच्या इमारतीत गवताच्या गंजी लावल्याचे चित्र बघायला मिळते़ या इमारतींना किती दिवस विद्यार्थी आणि शिक्षिकांची प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला आहे़वांग-मराठवाडी प्रकल्पांतर्गत विस्थापित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सातारा- सांगली जिल्ह्यांतच होत आहे़ यापैकी ज्या गावांचे पुनर्वसन सांगली जिल्ह्यात झाले आहे़ त्याठिकाणी अपवाद वगळता १३ नागरी सुविधांसह गावठाणे परिपूर्ण झाल्याचे चित्र आहे़ तर काही गावांचे पुनर्वसन कोळेवाडी, घारेवाडी (ता़ कऱ्हाड), ताईगडेवाडी (ता़ पाटण), येथे करण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून चालू आहे़ प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार वीज, रस्ते, पाणी, प्राथमिक शाळा आदींसह तेरा नागरी सुविधांची पूर्तता करून गावठाणे प्रकल्पग्रस्तांच्या ताब्यातही देण्यात आली आहेत़ त्यापैकी ताईगडेवाडी गावठाणात बहुतेक प्रकल्पग्रस्तांनी घरे बांधून दोन वर्षांपासून वास्तव्यही चालू केले आहे़ मात्र, घरेवाडी आणि कोळेवाडी येथील गावठाणांकडे अजूनही प्रकल्पग्रस्त फिरकलेलेच नसल्याने तेथे बांधण्यात आलेल्या प्राथमिक शाळा इमारतींची मोठी दुरवस्था झाली आहे़ आध्यापनापूर्वीच इमारतींचे दरवाजा-खिडक्यांची मोडतोड करून खिडक्या गायबही झाल्या आहेत़ (प्रतिनिधी)