शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

आंबा हंगामाची अखेर

By admin | Updated: May 28, 2014 01:32 IST

नेपाळी गुरख्यांचा परतीचा प्रवास सुरु

उमेश पाटणकर ल्ल रत्नागिरी मुंबईकरांना हापूसची चव मनमुराद चाखता यावी, यासाठी थंडी, वारा, ऊन, जंगली श्वापद यांची तमा न बाळगता प्रसंगी स्वत:चे प्राणही पणाला लावणारे राखणदार आपल्या घराकडे परतू लागले आहेत. रत्नागिरीमधून त्यांच्या गावाजवळ जाण्यासाठी रेल्वेची सोय असली तरी कोल्हापूर मार्गे जाणे त्यांनी पसंत केलेय. प्रामाणिक कामगार म्हणून नावलौकीक असणारे नेपाळी गुरखे यावर्षीचा आंबा हंगाम संपल्याने नेपाळकडे परतू लागले आहेत. कोकणचा आर्थिक गाडा सांभाळणार्‍या हापूसचा हंगाम सर्वसाधारपणे नवरात्र - दिवाळी दरम्यान सुरु होतो. झाडांवर कैरी दिसू लागताच बागायतदारांची राखणीसाठी धावपळ सुरु होते. कारण माकडांचा याच काळात उपद्रव मोठ्या प्रमाणात सुरू होतो. अशावेळी त्यांच्या नजरेसमोर येतो तो गुरखा. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नेपाळी नागरिक कोकणात मोठ्या प्रमाणात येतात. आंबा बागेच्या राखणीसाठी त्यांचा कल असला तरी बागायतदार जुन्या गुरख्यांनाच राखणीसाठी ठेवतात. नव्याने आलेले गुरखे राखणदारीचे काम मिळाले नाही म्हणून नाराज न होता अन्य कामेही करु लागले. १५ ते २० वर्षांपूर्वी केवळ बागायतींची राखणी जीवापाड करणारे गुरखे गेल्या चार-पाच वर्षांत औषध फवारणीसह आंब्याची काढणीही करु लागले. उंच झाडांवर शेंड्यापर्यंत जाण्यास घाबरणार्‍या स्थानिक कामगाराची जागा गुरख्यांनी कधी घेतली हे स्थानिकांना कळलेच नाही. या नेपाळी युवकांनी आपल्या कामाची प्रगती यापुढेही नेत आंबा हाताळणी, पेट्या भरणे, वाहतूक करण्यासाठी चारचाकी गाड्या चालवण्यापर्यंत मजल मारली आहे. येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात होईल. नेपाळमध्येही जूनच्या मध्यापर्यंत पाऊस सुरु होत असल्याने तत्पूर्वी गावाकडे पोहोचून शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी गुरखे माघारी निघाले आहेत. आज रहाटाघर बसस्थानकातून किमान १०० गुरखे कोल्हापूरकडे रवाना झाले, तर रेल्वेस्टेशनकडून १५० पेक्षा जास्त गुरखे दिल्लीकडे गेले.