शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शासन संपादित जागेत अतिक्रमण

By admin | Updated: August 29, 2014 23:10 IST

स्थापित प्रकल्पग्रस्त समिती ठाम : जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील निर्णय

शिरगाव : कोयना प्रकल्पासाठी शासनाने जमीन संपादित केली. मात्र, आमच्याकडे दुर्लक्ष झाले. दोन महिन्यांपूर्वी स्थापित प्रकल्पग्रस्त समितीने उपोषण सोडल्यानंतरच्या चर्चेत शासनाने केवळ स्थानिक विकासकामातच बोलावे, उर्वरित निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालीच घेतला जाईल, अशी ठाम भूमिका समितीने स्पष्ट केली आणि अर्ध्या तासातच बैठक संपली. शासन संपादित जागेत अतिक्रमण झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्यावरून नाराजीचे वातावरण आहे. मात्र आपणास वरिष्ठ पातळीवरुनच जिल्हाधिकाऱ्यांना शासन संपादित जमिनीवरील अतिक्रमण, बांधकाम यांची माहिती व कार्यवाहीबाबतचा अहवाल देण्याचे आदेश असल्याचे कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता रोकडे यांनी या समितीला स्पष्ट केले. कोयना प्रकल्पाचा कार्यविस्तार कान्हे पिंपळी अवजल कालवा ते पेढांबे, नागावे, अलोरे कोळकेवाडी, पोफळी असा विस्तारल्याने प्रकल्पग्रस्तांच्या दबावाखाली शासनाने निर्णय घेतल्यास अनेक ग्रामस्थ तसेच छोटे व्यावसायिक यांच्यावर कटू प्रसंग ओढवण्याची शक्यता होती. तथापि, अतिक्रमणाबाबत शासनाने तूर्तास केवळ माहितीच घेण्याची भूमिका घेतल्याने तणाव संपुष्टात आला आहे. कोणालाही लक्ष्य करुन शासनाला एकतर्फी निर्णय घेता येत नाही, तसा अधिकारही प्रशासनाला नाही. धोरणात्मक निर्णय सर्वांसाठीच होईल, असे अप्रत्यक्षरित्या सांगण्यात आल्याने छोट्या उद्योगधंद्यासाठी शासनाची जागा प्रकल्पग्रस्त तूर्तास वापरु शकतात, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे गणेशोत्सवानंतर पुन्हा समिती शासनाविरोधात न्यायालयात जाईल, असे सांगण्यात येत आहे.दरम्यान, शासनाच्या जागेतील अतिक्रमणांबाबत ग्रामपंचायतीने ठराव करुन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या भावना शासनाकडे मांडल्या असल्याची माहिती अलोरे ग्रामसभेत देण्यात आली आहे. त्यातून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून केली जात आहे. (वार्ताहर)