शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांमुळे ‘सॅण्डी’ जाळ्यात

By admin | Updated: May 1, 2016 00:42 IST

पळून जाणाऱ्या तोतया दिग्दर्शकाला पाठलाग करून पकडले

गणपतीपुळे : चित्रपट मालिकांचा दिग्दर्शक असल्याचे भासवत येथील हॉटेल अभिषेक बीच रिसॉर्ट व स्पा या हॉटेलमध्ये सुमारे दोन दिवस भाड्याने खोली घेऊन राहिलेला सॅण्डी उर्फ संदीप पाटील हॉटेल व्यवस्थापकाची सजगता व हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या धाडसामुळे अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याचे कारनामे आता पुढे येऊ लागले आहेत.हॉटेल अभिषेक बीच रिसॉर्ट व स्पाचे जनरल मॅनेजर विनायक मोडक यांच्या सजगतेमुळे संदीप हा भामटा असावा, असा त्यांना संशय आला. संदीपबाबत येत असलेली शंका खरी आहे का, याचा विनायक मोडक अभ्यास करत होते. संदीप याने या हॉटेलमध्ये सुमारे २० खोल्या आरक्षित केल्या. खोल्या आरक्षित करताना सर्व सोपस्कार पार पाडायचे असतात. त्याचे ओळखपत्र व इतर लागणारी जुजबी माहिती घेताना त्याच्याकडे पैसे अगर कोणतेही आयडी प्रुफ नव्हते. त्यामुळे हॉटेलचे मालक तेंडुलकर यांना याबाबतची माहिती देण्यात आली.दिनांक २८ रोजी अभिषेक बीच रिसॉर्ट अ‍ॅण्ड स्पाचे जनरल मॅनेजर विनायक मोडक यांनी त्याचे इंटरनेटवर नाव टाकल्यानंतर तो एक टॉपलिस्ट गुन्हेगार असल्याचे पुढे आले आणि खऱ्या नाट्याला सुरुवात झाली. मोडक यांनी प्रथमत: त्याला आपल्या केबीनमध्ये बसवून ठेवले व शुटींगसाठी येणाऱ्या गेस्टना आवश्यक असलेल्या २० रुम्सचे बुकींग झाले आहे, मात्र आपला आयडी द्या, असे सांगितले. त्यावेळी संदीप गडबडला आणि फोन आल्याचे नाटक करत बाहेर आला. मात्र, तोपर्यंत हॉटेल अभिषेकचे कर्मचाऱ्यांनी ट्रॅप लावला होता. तो फोनवर बोलत खाली पार्किंगपर्यंत आला व त्याने आपल्याबरोबर भाड्याने मुंबईवरुन आणलेल्या गाडीच्या ड्रायव्हरला गाडी काढण्यास सांगितले आणि पळण्याचा प्रयत्न केला. परंतु, हॉटेल अभिषेकचे कर्मचारी यांनी जनरल मॅनेजर आपल्याला बोलावत असल्याचे सांगितले आणि पुन्हा मॅनेजर यांच्या केबीनमध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा फोन आला आहे, असे भासवत तो हॉटेलच्या बॉयलरपर्यंत गेला. त्या ठिकाणाहून तो बाहेर ज्या ठिकाणी गाड्या पार्किंग करतात त्या ठिकाणी गेला. तोपर्यंत हॉटेलचे कर्मचारीही त्याच्या मागावरच होते. गणपतीपुळेतील रिक्षा व्यवसायिकांना याबाबतची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे हा भामटा येथील एका रिक्षात बसून चाफे या ठिकाणी जात असताना हॉटेल अभिषेकचे पारकर व त्यांच्याबरोबर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला ओळखले व त्या रिक्षाचा पाठलाग करत त्याला पकडून पोलिसांना माहिती देण्यात आली.गणपतीपुळे येथील फोटोग्राफर वैभव घाग यांच्याकडे भाड्याने व्हिडीओ कॅमेरा मिळेल का? यासाठीही संदीप गेला होता, असे कळते. मात्र, त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. (वार्ताहर)