शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बाजार समितीची निवडणूकच

By admin | Updated: March 29, 2016 23:51 IST

बिनविरोधचा प्रयत्न फोल : ११ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक सर्वपक्षीय सहकार पॅनेलच्या माध्यमातून बिनविरोध करण्याचा प्रयत्न फसला आहे. १८ जागांसाठी येत्या १७ एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीत ७ जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या २९ मार्च या अखेरच्या दिवशी ११ जागांसाठी १६ उमेदवार निवडणूक रिंगणात उरल्याने निवडणूक अटळ बनली आहे. सहकारी संस्था मतदारसंघ (कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था) सर्वसाधारणमध्ये ६ जागांसाठी ८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये संजय चंद्रकांत आयरे (रिंगणे, लांजा), अरविंद गोविंद आंब्रे (आवाशी, खेड), राजेश हरिश्चंद्र गुरव (पेंडखळे, राजापूर), अनिल विठ्ठल जोशी (हरचिरी, रत्नागिरी), दत्तात्रय सोपान ढवळे (देवरूख, संगमेश्वर), मधुकर दिनकर दळवी (वेळवी, दापोली), शौकत हुसैन माखजनकर (सावर्डे, चिपळूण), माधव शंकर सप्रे (ससाळे, राजापूर) यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती / जमाती ग्रामपंचायत मतदारसंघात एका जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये महेंद्र धर्मा कदम (डुगवे, चिपळूण), निकिता राजीव पवार (खानू, रत्नागिरी) यांचा समावेश आहे. व्यापारी व अडते मतदारसंघात २ जागांसाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये हेमचंद्र यशवंत माने (जाकीमिऱ्या, रत्नागिरी), कौस्तुभ विनायक केळकर (मालगुंड, रत्नागिरी) व गजानन किसन नंदाने (घुडेवठार, रत्नागिरी) यांचा समावेश आहे. कृषी प्रक्रिया व पणन संस्था मतदारसंघात १ जागेसाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये चंद्रशेखर मधुकर सिनकर (राजापूर), बिल्कीस फारुक मुकादम (तुळसणी, संगमेश्वर), जयवंत गणपत विचारे (वरवडे, रत्नागिरी) यांचा समावेश आहे. सहकार क्षेत्रात निवडणुकीपेक्षा सामंजस्याने सर्वपक्षीय पॅनेल करून कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी केला होता. त्यासाठी सर्व पक्षांच्या उमेदवारांना प्राधान्य असलेली उमेदवार यादीही २८ मार्चला घेतलेल्या पत्रकारपरिषदेत जाहीर केली होती. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. मात्र, कॉँग्रेस व अन्य काही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मार्ग न घेतल्याने बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न फसला आहे. ११ जागांसाठी १६ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराला आता वेग आला आहे. (प्रतिनिधी)१७ एप्रिलला निवडणूक : ७ उमेदवार बिनविरोध विजयी...बाजार समिती निवडणुकीत सर्वपक्षीय सहकार पॅनेलचे उमेदवार गजानन पाटील, सुरेश कांबळे, विठाबाई कदम, आशालता सावंतदेसाई, प्रकाश जाधव, संजय नवाथे व मेघा कदम हे बिनविरोध विजयी झाले आहेत. मात्र, निवडणुकीनंतर अधिकृतपणे याची घोषणा होणे बाकी आहे. सर्वपक्षीय सहकार पॅनेल करूनही कॉँग्रेसमधील दुसऱ्या गटाने सर्वसाधारणमध्ये राजेश गुरव, ग्रामपंचायत मतदारसंघात निकिता पवार व व्यापारी अडते मतदार संघात गजानन नंदाणे यांचे दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानेच ही निवडणूक अटळ ठरल्याची चर्चा आहे.