शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या वर्षीही लवकर या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 23:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : ‘गणपत्ती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात गुरूवारी आवडत्या बाप्पाला भक्तांनी जड अंत:करणाने निरोप दिला. जिल्ह्यातील एक लाख १६ हजार २८ घरगुती आणि १७ सार्वजनिक गणेशांचे तसेच गौरींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले.यावर्षी गणरायाचा सात दिवस मुक्काम होता. यापूर्वी दीड आणि पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : ‘गणपत्ती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात गुरूवारी आवडत्या बाप्पाला भक्तांनी जड अंत:करणाने निरोप दिला. जिल्ह्यातील एक लाख १६ हजार २८ घरगुती आणि १७ सार्वजनिक गणेशांचे तसेच गौरींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले.यावर्षी गणरायाचा सात दिवस मुक्काम होता. यापूर्वी दीड आणि पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे. गुरुवारी सातव्या दिवशी जिल्ह्यातील एकूण १ लाख १६ हजार ४५ गणेशमूर्तींचे गौरींसह विसर्जन करण्यात आले. दुपारनंतर विसर्जनासाठी मूर्तींना बाहेर आणण्यात आले. यावर्षी डॉल्बी किंवा डीजे याच्यावर बंदी असल्याने विसर्जन मिरवणूक ढोल - ताशांच्या साथीने काढण्यात आली. काल बुधवारपासून पावसाने विश्रांती घेतल्याने वाजतगाजत विघ्नहर्त्याला निरोप देण्यात आला. बाप्पाच्या आगमनाने गजबजलेले घर आता त्याच्या जाण्याने रिते होणार, या कल्पनेने बहुतांशी महिलावर्गाचे डोळे भरून येत होते. आरती झाल्यानंतर मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घरगुती ५,६२८ तर सार्वजनिक ४, ग्रामीण पोलीस स्थानकाचे हद्दीत घरगुती ७,६९४ गणपतींचे विसर्जन करण्यात आले.जिल्हा पोलीस प्रशासनाने विसर्जनस्थळी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. जिल्ह्यातील १३ प्रमुख विसर्जनस्थळांवर व ३९८ घाटांवर सीसीटीव्ही कॅमºयांद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते. प्रमुख किनाºयांवर जीवरक्षकांना अत्याधुनिक सामुग्रीसह सज्ज ठेवण्यात आले होते. निर्माल्य संकलनासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्यासह रोटरी क्लब तसेच अन्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.निर्माल्य संकलन : विविध सामाजिक संस्थांचा उपक्रमात सहभागजिल्ह्यातील एक लाख १६ हजार २८ घरगुती आणि १७ सार्वजनिक गणेशांचे विसर्जन.यावर्षी गौरी-गणपतीचा सात दिवस मुक्काम.डॉल्बी किंवा डीजे यांच्या वापरावर बंदी.विसर्जन मिरवणूक ढोल - ताशांच्या गजरात.पावसाने विश्रांती घेतली असल्याने वाजतगाजत विघ्नहर्त्याला निरोप.रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरु.रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारतीय पर्यावरण व तंत्रज्ञान संस्था तसेच विविध सामाजिक संस्था, शाळा - महाविद्यालये यांच्या सहकार्याने विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात आले. शहरातील भक्तांनीही या उपक्रमाला सहकार्य केले.