शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

‘कुणीतरी आहे तिथे...’ ने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

रत्नागिरीतील डॉक्टरांचा सहभाग : आपल्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी एका नाटकाचे सादरीकरण

रत्नागिरी : रूग्णसेवेबरोबरच स्वत:च्या कलागुणांना वाव देत इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेच्या येथील डॉक्टर मंडळींनी ‘कुणीतरी आहे तिथे..’ हे सुरेश खरे लिखित दोन अंकी नाटक सादर केले. आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने संस्था दरवर्षी एखादे नाटक सादर करते. यावर्षीही डॉ. शशांक पाटील दिग्दर्शित ‘कुणीतरी आहे तिथे’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.सरदार जगतापांच्या मृत्यूनंतर २० वर्षांनी त्यांच्या इच्छेनुसार मृृत्यूपत्राच्या वाचनाचा कार्यक्रम त्यांच्याच शहरापासून दूर असलेल्या जुन्यापुराण्या वाड्यात ठेवलेला असतो. त्यांना मूलबाळ नसल्याने ही २० कोटींची मालमत्ता कोणत्या नातेवाईकाला मिळणार, ही उत्सुकता सर्वाना असते. त्यामुळे त्यांचे आणि पत्नीचे भाचे, पुतणे - पुतण्या रात्री एकत्र जमतात. त्या रात्री दिवे गेलेले असतात व बाहेर पाऊस पडत असतो. प्रथम सॉलिसीटर प्रधान (डॉ. रवींद्र गोंधळेकर) तिथे येतात. त्यांचे स्वागत अस्ताव्यस्त दाढी वाढलेला, एक पाय ओढत चालणारा, गूढ बोलणारा वृद्ध रामशरण कंदिलाच्या उजेडात प्रकाश करतो. ही भूमिका दिग्दर्शक डॉ. शशांक पाटील यांनी सादर केली. मृत्यूपत्राच्या वाचनानंतर ही मालमत्ता सरदारांची पुतणी पद्मा (डॉ. मेधा गोंधळेकर) हिला मिळते. मृत्यूपत्रात आणखी एक अट असते, पद्मा वेडी ठरली, तर ही इस्टेट दुसऱ्या पाकिटात नाव असलेल्या व्यक्तिला मिळेल. हे पाकिट प्रधान आपल्याकडेच ठेवतात. बरीच रात्र झाल्याने रात्र इथेच काढावी, असं सर्वजण ठरवतात आणि कॉफी घेण्यासाठी ते सारे कीचनमध्ये जातात. येथूनच खऱ्या भयनाट्याची सुरूवात होते. पद्माशी बोलणारे प्रधानसाहेब मागच्या मागे गायब होणे, भिंत सरकून अचानक हात बाहेर येतो आणि तो पद्माचा हार घेऊन जातो. मेंटल हॉस्पिटलचा रखवालदार मोहिते (डॉ. दत्तप्रसाद केतकर) हॉस्पिटलमधून खुनी वेडा- पळाल्याचे सांगतो. ताण वाढत जातो. इतक्यात वेडा डॉक्टर (डॉ. मयूर कांबळे) येतो. तो पद्माला वेडा ठरवण्याचा प्रयत्न करतो. यातच सुरेखाचा (डॉ. माधुरी पेवेकर) खून होतो. तिची बहीण लिली (डॉ. दीपा पावसकर) गायब होते. बंगल्याच्या आवारात मोहितेचे प्रेत सापडते. खुनी कोण, पद्माला वेडी ठरवण्याचा प्रयत्न कोण करत असतं. तिच्यावर प्रेम करणारा देखणा शेखर (डॉ. अतुल देशपांडे), तिरसट चंद्रकांत (डॉ. नितीन चव्हाण) की भोळसट मनोहर (डॉ. मतीन परकार)? एकापाठोपाठ घडणाऱ्या या अनाकलनीय घटनांमुळे उत्कंठा वाढवण्यात डॉ. शशांक पाटील कमालीचे यशस्वी ठरले आहेत. डॉ. माधुरी पेवेकर, डॉ. मयूर कांबळे आणि डॉ. मतीन परकार यांनी पदार्पणातच चांगली छाप पाडली आहे. डॉ. मेधा गोंधळेकर यांनी पद्मा पूर्ण ताकदीने उभी केली. नाटक हळूहळू उलगडण्याचे कौशल्य आयएमएच्या अध्यक्षा डॉ. कल्पना मेहता यांच्या नाट्यपूर्ण निवेदनातून दिसून येते. डॉ. नितीन चव्हाण यांचे शीर्षक गीत मनोवेधक ठरले. संगीताला साज दिलाय तोही डॉ. चव्हाण आणि विवेक वाडिये यांनी. ध्वनी संयोजन आशिष घाणेकर, प्रकाशयोजना प्रदीप शिवगण आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी केली होती. डॉ. निनाद आणि डॉ. नीलेश नाफडे बंधूंचे मार्गदर्शन या नाटकाला लाभले. डॉ. संजीव पावसकर, डॉ. अनिषा, अश्विन वैद्य, संपदा जोशी यांचे उत्तम सहकार्य नाटकाला मिळाले. या सर्वांच्या परिश्रमाने डॉक्टर मंडळींचा आगळावेगळा नाट्यप्रयोग रसिकांना पहायला मिळाला. (प्रतिनिधी)