शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचे डास शिरसगावात की बांबवडेत?

By admin | Updated: September 11, 2016 00:24 IST

दोन आरोग्य केंद्रात जुंपणार : ठोस उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी

प्रमोद रावळ--आळसंद  -शिरसगाव (ता. कडेगाव) येथील मंदाकिनी सकटे या विवाहितेचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने या कार्यक्षेत्रात असलेल्या मोहिते वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने जबाबदारी झटकण्याचा उद्योग सुरू केला आहे. ही महिला बांबवडे (ता. पलूस) येथे माहेरी गेल्यानंतर तिला डेंग्यू झाल्याचा शोध या आरोग्य केंद्राने लावला आहे. मात्र, या महिलेला माहेरी जाण्यापूर्वीच शिरसगाव येथे ताप आला होता, असे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे डेंग्यूचे डास शिरसगावात की बांबवडेत आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या वादामुळे कुंडल व मोहिते वडगाव आरोग्य केंद्रात जुंपण्याची शक्यता आहे. शिरसगाव येथील महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाची तारांबळ उडाली. वरिष्ठ पातळीवरून चौकशी व सर्व्हेचा आदेश येताच मोहिते वडगाव केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल कांबळे व आरोग्य सहाय्यक दिनकर जाधव यांनी मंदाकिनी सकटे गेल्या आठवड्यात बांबवडेला माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे तेथेच त्यांना डेंग्यूची लागण झाली असावी, असे सांगत जबाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.याबाबत संबंधित महिलेचा भाऊ बाळासाहेब सोनावले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मंदाकिनी यांना दि. २६ आॅगस्टपासून शिरसगाव येथे असतानाच ताप येत होता. त्यामुळे त्या आजारी होत्या. दि.२९ आॅगस्टला बांबवडे येथे कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्या स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेऊन पुन्हा शिरसगावला गेल्या. दि. २ सप्टेंबरला ताप कमी होत नसल्याने त्यांना पलूस येथे उपचार करण्यात आले. त्यानंतर मंदाकिनी यांना सांगलीला हलविण्यात आले. त्याठिकाणी डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाले. मंदाकिनी यांना त्यांच्या गावातच शिरसगावला डेंग्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे. असे असतानाही याबाबत कोणताही आधार नसताना केवळ जबाबदारी झटकली जात आहे.आता कुंडल व मोहिते वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात विरोधाभास दिसू लागला आहे. दोन्ही आरोग्य केंद्रे डासांबाबत वेगवेगळी विधाने करत आहेत. परंतु, डेंग्यूचे डास शिरसगावात आहेत की बांबवडेत, या वादात पडण्यापेक्षा यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.सर्वेक्षणाचे आदेश जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी शनिवारी शिरसगाव येथे भेट दिली. त्यावेळी मृत सकटे यांचे नातेवाईक व गावातील ताप आलेले रुग्ण यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्याबरोबर गावात सर्व्हे करण्याच्याही सूचना दिल्या. यावेळी डॉ. देशमुख यांनी बांबवडे व शिरसगाव या दोन्ही गावात सर्व्हे करण्याचा आदेश आरोग्य विभागाला दिला असून, डासांची घनता कमी करण्यासाठी उपाय योजना सुरू केल्याचे सांगितले.