शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.च्या अपघातात घट

By admin | Updated: December 20, 2014 23:36 IST

परिवहन महामंडळ : गेल्या आठ महिन्यात झाले ८८ अपघात

रत्नागिरी : चालकांसाठी प्रशिक्षण, योग्य नियोजन, गाड्यांची वेळच्यावेळी दुरूस्ती, जुन्या गाड्या भंगारात काढून नवीन गाड्यांचा समावेश शिवाय दररोज घेण्यात येणाऱ्या आढावा यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या अपघातामध्ये घट होत असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी वर्षभरात १२० अपघात झाले होते तर चालू वर्षी गेल्या आठ महिन्यात ८८ अपघात घडले आहेत.गेल्या वर्षभरातील एकूण १२० अपघातापैकी १७ प्राणांतिक अपघात असून ९६ अपघात गंभीर आहेत तर किरकोळ अपघात ७ आहेत. तर चालू वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर अखेर प्राणांतिक अपघात ९ असून गंभर अपघात ७३ तसेच किरकोळ अपघात ६ आहेत.गतवर्षापेक्षा यावर्षी अपघातामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. एस. टी.च्या अपघातानंतर अपघाताच्या स्वरूपावर जखमी, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मदत निधी देण्यात येतो. अपघातानंतर चालकाची चौकशी केली जाते. शिवाय त्याला प्रशिक्षणासही पाठविण्यात येते. रत्नागिरी विभागाात सध्या २४० चालक प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण सुरू आहे. लवकरच प्रशिक्षण पूर्ण करून चालक सेवेत हजर होणार आहेत. त्यामुळे सध्या चालकांवर येणाऱ्या दुहेरी ड्युटीचा ताणदेखील कमी होणार आहे. त्यामुुळे अपघात होत असले तरीही गेल्या काही महिन्यात ते प्रमाण कमी झाले आहे. एस. टी.चा कारभार आता हळूहळू सुधारत असल्याचे दिसून येत आहे.रत्नागिरी आगारात एस. टी.च्या ७९० गाड्या असून, त्यामध्ये लवकरच नवीन १०० गाड्यांची भर पडणार आहे. दररोज एस. टी.च्या ४५०० फेऱ्यांव्दारे २ लाख १६ हजार किलोमीटर प्रवास होतो.दररोज एस. टी. एकूण ५० हजार लीटर डिझेल लागते. त्यासाठी किमान ३० लाख १५ हजार ५०० रूपये खर्च येतो. प्रतिदिन विभागास ६५ लाख रूपये खर्च येतो. विभागात १४७३ चालक, १६०० वाहक असून, दरमहा ५ ते १७ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत असून, गेल्या दहा महिन्यात १३९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून ३१ हजार ७८४ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.रत्नागिरी विभागाचे पूर्वी प्रतिदिन ५० लाखांपर्यंत उत्पन्न होते. परंतु सध्या उत्पन्नात वाढ झाली असून, ६५ लाख इतके झाले आहे. अनेक ठिकाणी सुमारे ५० हून अधिक जादा गाड्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत.गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, निवडणूक, तसेच उन्हाळी सुटीचे योग्य नियोजन करण्यात आल्याने विभागाला नुकतीच ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. विनाअपघात सेवा, स्वच्छ व सुंदर गाड्या या योजना राबविण्यात येत आहेत. नवीन वर्षात ‘मागेल त्याला एस. टी.’ ही योजना राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)