शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेतील गटबाजी ‘सीसीटीव्ही’मुळे उघड

By admin | Updated: July 15, 2017 14:26 IST

उद्घाटन सोहळ्याच्या पत्रिकेत आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांची नावेच नाहीत

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी , दि. १५ : जिल्हा शिवसेनेत अंतर्गत मतभेदांची दरी रुंदावत चालल्याची चर्चा जोरात आहे. त्यातच १३ जुलैच्या रत्नागिरीतील सी. सी. टी. व्ही. कॅमेरा उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत स्थानिक आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांची नावे नसल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. त्यामुळे जिल्हा शिवसेनेतील गटबाजी सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस व भाजपने मध्यावधी निवडणुकीची तयारी जिल्ह्यात सुरू केलेली असताना शिवसेनेतील ऐक्याला लागलेला गटबाजीचा भुंगा ठेचणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मूळचे खेड येथील व मुंबईत वास्तव्याला असलेले मंत्री रवींद्र वायकर यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले हे सेनेतील अनेकांना रुचलेले नाही. या पदासाठी सक्षम असलेल्यांना डावलल्याची भावना त्यामुळे काही स्थानिक नेत्यांमध्ये निर्माण झाली. काहीजण आजही या पदावर डोळा ठेवून आहेत. या घडामोडीनंतर रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे सेनेचे खासदार विनायक राऊत आणि दक्षिण रत्नागिरीतील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी असा समविचारी गट सेनेत केव्हा सक्रीय झाला, हे शिवसैनिकांनाही कळले नाही. पालकमंत्री वायकर रत्नागिरीत आले तरी त्यांच्याबरोबर दक्षिण रत्नागिरीतील सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राबता कधीच दिसून आला नाही. हा जणू त्यांच्यावर बहिष्काराचाच प्रकार होता. वायकर यांनीही याची फार दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन समिती बैठक व अन्य काही महत्त्वाचा कार्यक्रम असेल, तरच वायकर रत्नागिरीत येत होते. रत्नागिरी जिल्हा सी. सी. टी. व्ही. निगराणीच्या कक्षेत आणण्यासाठी जिल्हा पोलीस दल व जिल्हा नियोजन समितीच्या संयुक्त विद्यमाने सी. सी. टी. व्ही. प्रकल्पाच्या उद्घाटनाचा सोहळा १३ जुलै रोजी करण्याचे ठरले. त्याचे रवींद्र वायकर यांच्या हस्ते उद्घाटन व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा नियोजन अधिकारी, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता यांची नावे असलेली कार्यक्रम पत्रिका प्रसिध्द झाली तेव्हा स्थानिकांना डावल्याचा आक्षेप घेण्यात आला. आता नव्याने कार्यक्रम पत्रिका छापून हा कार्यक्रम घेण्याचे वायकर यांनी ठरविले आहे. मात्र, यानिमित्ताने सेनेतील गटबाजीचे दर्शन पुन्हा घडल्याची चर्चा आहे.