शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या इमारतीची दुरुस्तीअभावी दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2016 00:45 IST

अक्षम्य दुर्लक्ष : मोक्याच्या जागेत असूनही प्रशासन बेफिकीर

सुभाष कदम -- चिपळूण -येथील पंचायत समितीच्या सभापती निवासस्थानासमोर बहादूरशेख येथे असलेल्या मोक्याच्या जागेवरील इमारतींची गेली ८ ते १० वर्षे देखभाल न झाल्याने पडझड झाली आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या इमारती आता अखेरच्या घटका मोजत आहेत. बहादूरशेख येथे गुरुकुल कॉलेजसमोर पंचायत समितीच्या मालकीचे सभापती निवासस्थान, उपअभियंता बांधकाम विभाग निवासस्थान, गटविकास अधिकारी निवासस्थान, पाणी पुरवठा उपअभियंता निवासस्थान व सहाय्यक अभियंतासाठी निवासस्थान आहे. सध्या येथे बांधकामचे उपअभियंता जालिंदर मोहिते राहतात, तर माजी सभापती शौकत मुकादम यांच्यानंतर एकाही सभापतीने सभापती निवासस्थानाचा वापर केलेला नाही. निवृत्त गटविकास अधिकारी सुरेखा खेराडे या गटविकास अधिकाऱ्यांचा बंगला वापरत होत्या. परंतु, त्यांच्या नंतर हाही बंगला बंद असतो. याच आवारात पाणी पुरवठा खात्याच्या उपअभियंत्यांसाठी व सहाय्यक अभियंत्यांसाठी एक इमारत आहे. या इमारतीत पूर्वी पाणी पुरवठा खात्याचे उपअभियंता एस. आर. चंदनशिवे राहात होते. त्यांची बदली झाल्यानंतर हे निवासस्थान वाऱ्यावर गेले. इमारतींचा वापर होत नसल्याने इमारतींवरील कौले, रिपा, वासे यांची पडझड झाली आहे. दरवाजे निखळले आहेत, खिडक्यांचा पत्ताच नाही. इमारतीत वाळूचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शासनाकडून ही इमारत निर्लेखित करण्यात आलेली नाही किंवा इमारतीची डागडुजीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या इमारतींची अवस्था दयनीय झाली आहे. येथील विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला आहे. दरवाजे कुजून गेले आहेत, तर खिडक्यांची मोडतोड झाली आहे. या इमारतींची दुरुस्ती केल्यास निवासस्थान म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांना वापरता येईल. मात्र याची कुणालाच फिकीर नसल्याचे दिसून येत आहे.पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून ही इमारत पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे.जिल्हा परिषदेच्या मालकीची पंचायत समितीच्या अखत्यारित असलेली चिपळूणमधील इमारतीची पडझड झाल्याचे वृत्त यापूर्वीही लोकमतने प्रसिध्द केले होते. परंतु, लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाचे डोळे उघडलेले नाहीत. आता या इमारतीला घरघर लागली असून कोणत्याहीक्षणी ती जमिनदोस्त होण्याची शक्यता आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या बेपर्वाईमुळे शासकीय इमारतींची पडझड होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.