शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
3
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
4
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
5
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
8
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
9
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
11
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
12
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
13
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
14
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
15
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
16
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
17
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
18
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
19
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
20
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

पावसाअभावी पुराचा धोका टळला

By admin | Updated: November 1, 2015 22:55 IST

राजापूरची पूर समस्या : पुराची टांगती तलवार कायम; गाळाचा प्रश्न ‘जैसे थे’

राजापूर : सरत्या पावसाळ्यात नेहमीपेक्षा कमी पाऊस पडल्याने यावर्षी एकदाही पुराचे पाणी शहरात भरले नाही. तरीही भविष्यातील पुराची टांगती तलवार काही दूर झालेली नाही. त्यामुळे नदीपात्रातील गाळाचा उपसा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राजापूरकरांवरील पुराचे संकट कायम आहे. त्यामुळे आगामी काळात तरी शहरातील गाळ उपश्याचे अर्धवट राहिलेले काम मार्गी लागेल का हाच खरा सवाल आहे. मागील अनेक वर्षे राजापूर शहराला पुराच्या विळख्याचा त्रास सहन करावा लागत असून, दरवर्षी पावसाळ्यातून किमान चार ते पाचवेळा राजापूरवासियांना या अग्नीदिव्यातून जावे लागते. त्याचा परिणाम हा संपूर्ण शहराच्या जनजीवनावर होतो. सन १९८२ व सन १९९७मध्ये सर्वात मोठा पुराचा फटका या शहराला बसला होता. त्यामुळे पावसाळा सुरु झाला की, राजापूरच्या नदीकाठावरील समस्त नागरिक व व्यापारी यांना रात्रन्रात्र जागून काढावी लागते. मागील अनेक वर्षात या पुराने राजापूरवासियांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन राजापूरचे तत्कालीन आमदार गणपत कदम यांनी याबाबत सातत्याने आवाज उठवत शासनाकडे पाठपुरावा सुरुच ठेवला होता व अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. शासनाने कोदवली व अर्जुना या दोन नद्यांतील गाळ उपशाला सुरूवात करण्यात आली. त्यासाठी शासनाने सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. हे काम शासनाकडून कोल्हापूरच्या जलसंपदा अभियांत्रिकी विभाग, तिलारी यांनी देण्यात आले. तिलारी विभाग स्वत:कडील यंत्रसामुग्री वापरणार असल्याने शासनाला केवळ इंधनाचा खर्च द्यावा लागणार होता. त्यानुसार नियोजित कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले व एकूण १ लाख ९८ हजार ७७२ घनमीटर एवढा उपसा करण्याचे ठरले. २००९ साली प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. त्यावेळी केवळ ६५हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. मात्र, पुढील तीन वर्षात कामात थोडी गती आली व जवळपास ९८हजार घनमीटर गाळाचा उपसा झाला. त्यासाठी ४१ लाख ६१ हजार १४३ एवढा खर्च झाला होता. अजून एक लाख घनमीटर गाळाचा उपसा बाकी होता. या कालावधीत उपसलेला गाळ नद्यांच्या दुतर्फा डंपिंग करुन ठेवण्यात आला. मात्र, त्यानंतर आलेल्या पुराच्या पाण्यात बराचसा गाळ पुन्हा नदीपात्रात सामावला. त्यानंतर मागील पाच ते सहा वर्षात गाळ उपशाच्या कामाला सुरूवात झालेली नाही. शहरातील पुराला कारणीभूत ठरणाऱ्या दोन नदीपात्रांतील गाळाचा उपसा करण्यात आल्यानंतर शहरात घुसणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले होते. यापूर्वी ज्या वेगाने पुराचे पाणी शहरात घुसायचे तेवढी गती नंतर राहिली नाही. त्यामुळे शासनाने राहिलेल्या गाळाचा उपसा तत्काळ केल्यास राजापूरकरांवरील पुराचे संकट कायमचे दूर होईल. (प्रतिनिधी) पुराची समस्या : शहराच्या जनजीवनावर परिणाम राजापूर शहरातील पुराची समस्या कायम आहे. सन १९८२ आणि १९९७ मध्ये शहरात सर्वात मोठा पूर आला होता. या पुराचा फटका शहरातील व्यापाऱ्यांना अनेकवेळा बसला आहे. खर्ली पात्रातून हे पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत येऊन शहराला पुराचा विळखा बसतो. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते.