शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना जिद्द आणि परिश्रमाचे पंख

By admin | Updated: October 16, 2015 00:47 IST

माधुरी आणि करिश्मा : मानसकन्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रतिभा शासकीय महिला वसतिगृहाची धडपड --नारीशक्तीला सलाम

शोभना कांबळे --रत्नागिरी---हिऱ्याची चमक कुठेही लपत नाही म्हणतात. फक्त त्याला गरज असते ती योग्यरित्या पैलू पाडणाऱ्या जवाहिऱ्याची. माधुरी आणि करिश्मा या दोन अनाथ राऊत भगिनींची कथाही अशीच काहीशी. देवरूखच्या मातृमंदिर आणि त्यानंतर रत्नागिरीच्या प्रतिभा शासकीय महिला वसतिगृहाच्या या दोन मानसकन्यांच्या इच्छारूपी जिद्दीला या दोन संस्थांनी शिक्षणाचे पंख दिल्याने या दोघी भगिनी आता उच्च शिक्षणाच्या दिशेने भरारी घेऊ लागल्या आहेत. माधुरी राजेंद्र राऊत ही अनाथ असल्याने मुंबईच्या बालगृहात वाढली. दुसरीला असताना ती देवरूखच्या गोकुळ या बालगृहात दाखल झाली. वर्षभरातच तिच्या पाठची बहीण करिश्मा हीसुद्धा गोकुळमध्ये आली. गोकुळमध्ये संस्थेच्या प्रेमाच्या छायेखाली या दोन्हीही बहिणी वाढत होत्या. शिक्षणाबद्दल अतिशय आवड असल्याने सुरुवातीपासूनच दोघींचीही अभ्यासातील गती चांगली होती. माुधरीने दहावीला ७१.८० टक्के गुण मिळविले. तिने दहावीनंतर मेकॅनिकल ड्राफ्टस्मनचा कोर्स घेण्याचा निर्णय घेतला. खरंतर हा तिचा निर्णय धाडसीच होता. कारण या अभ्यासक्रमाला मुली जातच नाहीत. पण, संस्थेने तिच्या इच्छेचा आदर करीत तिला रत्नागिरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊन दिला आणि माधुरी रत्नागिरीच्या प्रतिभा महिला शासकीय वसतिगृहात दाखल झाली. या वसतिगृहाच्या अधीक्षक मंदा पाटील तसेच जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी जे. एस. शेख यांनी तिला अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले. पहिल्याच वर्षी तिला अ श्रेणी मिळाली. या कालावधीत तिने संगणक कोर्सही पूर्ण केला. यावर्षी तिने द्वितीय वर्षाची परीक्षा दिली. परीक्षेपूर्वीच पुण्यात झालेल्या भरती मेळाव्यात पुण्यातील एका बड्या कंपनीने प्रशिक्षणार्थी म्हणून तिची निवड केली आहे. नोकरी करतानाच या क्षेत्रातील अभियंता बनण्याचे तिचे स्वप्न आहे. त्यामुळे आता नोकरी करतानाच ड्राफ्टस्मन इंजिनिअरींग परीक्षा देण्याची तिची इच्छा आहे.माधुरीची बहीण करिश्मा देवरूखच्या महाविद्यालयात कला शाखेतून याचवर्षी बारावीत ६४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. कुठलीही शिकवणी नसतानाही तिने हे गुण मिळविले. माधुरी रत्नागिरीत असल्याने या दोघी बहिणी एकत्र असाव्यात, या उद्देशाने संस्थेने करिश्मालाही मातृमंदिरमधून येथे बोलावून घेतले. रत्नागिरीत आलेल्या करिश्माने बारावीनंतर पदवीधर व्हायचं, असच ठरवलं होत. पण, याच महत्त्वाच्या टप्प्यावर तिच्यासाठी दिशादर्शक ठरल्या त्या प्रतिभा महिला शासकीय वसतिगृहाच्या अधीक्षका मंदा पाटील. त्यांनी तिला रत्नागिरीतील कीर विधी महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. आता तिचे स्वप्न आहे ते वकील होण्याचे. त्यासाठी ती झटून अभ्यास करतेय.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मेकॅनिकल ड्राफ्टस्मन या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेली माधुरी ही २१ मुलांमध्ये एकमेव विद्यार्थिनी होती. हा कालावधी पूर्ण करताना सुरूवातीला आपणाला एकटेपणा जाणवायचा. पण, आपले शिक्षक आणि वर्गातील मुलांच्या सहकार्यामुळेच आपणाला हा अभ्यासक्रम पूर्ण करताना कुठलीच अडचण आली नाही, असे माधुरी राऊत सांगते. आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी कितीही कष्ट घेण्याची तिची इच्छा आहे.समाजशास्त्र हा कश्मिरा हिचा विशेष आवडीचा विषय. या विषयाच्या अभ्यासाने सामाजिक बांधिलकीची जाणीव होते, सामाजिक भान येते, असे ती सांगते. गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. चित्रा गोस्वामी यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा सतत या दोन भगिनींप्रमाणेच या संस्थेतील इतर मुलींनाही मिळत असते. आताचे जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी यु. एस. भोसले यांनी काहीही अडचण आली तर ती आपण दूर करू, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा मार्ग अधिकच सुकर होणार आहे.अनाथ कन्यांची उंच भरारीविशेष म्हणजे पहिल्या वर्षीच संस्थेने औदार्य दाखवून कश्मिरा हिला रत्नागिरीच्या कीर विधी महाविद्यालयाने फी मध्ये सवलत दिलीच; पण तिला पुस्तकेही उपलब्ध करून दिली. त्यामुळे तिचा प्रवेश सोपा झाला. अजूनही तिला बराच पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे वकील होऊन आपल्यासारख्याच अनेकांसाठी आधारस्तंभ होण्याची इच्छा असलेल्या कश्मिरा हिला पुढेही संस्थेने असाच हातभार दिला तर एका अनाथ कन्येचे वकील होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. असे झाले तर कश्मिरा ही रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली वकील असेल. आपल्या या वाटचालीत संस्था आणि आपल्या शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे ती सांगते.