जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज येथील प्रभारी मुख्याध्यापक हनुमंत कदम हे नुकतेच सेवानिवृत्त झाले़ या सेवानिवृत्तीबद्दल त्यांनी मालगुंड शिक्षण संस्थेच्या विकासकामासाठी शिक्षण संस्थेला रोख २५ हजार रुपये देणगी रूपाने दिले.
त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सत्कार समारंभ मालगुंड विद्यालयातील कै. सदानंद परकर सभागृहात पार पडला. समारंभाच्या अध्यक्षपदी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुनील मयेकर होते. काेविडचे सर्वनियम पाळून हा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव विनायक राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर पाटील यांसह संस्थेचे ट्रस्टी, संचालक, सल्लागार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ पाटील, सूत्रसंचलन मिलिंद सुर्वे, तर आभार नितीन मोरे यांनी मानले.
-------------------------------------
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील मयेकर यांच्याकडे प्रभारी मुख्याध्यापक हनुमंत कदम यांनी २५ हजारांची देणगी दिली.